मोठी बातमी! पिकलेले केस अन् तोंडाला मास्क, वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Walmik Karad : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. वाल्मिक कराडची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी सध्या सुरु असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली
रुग्णालयात केलं दाखल
संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु
Walmik Karad : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी सुरु असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं चित्र होतं.
हे ही वाचा : जालना : आई बाहेरगावी गेली अन् मैत्रिणीला घरी बोलावले, नंतर साहिलने केले भयानक कांड
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली
वाल्मिक कराडच्या अचानकपणे प्रकृतीत बिघाड झाला, त्याला सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोंडाला मास्क, पिकलेले केस बघून वाल्मिक कराडचे सर्व रुपच बदललं दिसून येतंय. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी सुरु असून तपासणीनंतर डिस्चार्जबाबत डॉक्टर निर्णय घेतील. दरम्यान, त्याच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणात जामीन अर्ज फेटाळून लावल्याची माहिती समोर आली.
रुग्णालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात
प्रकृती बिघडल्याने वाल्मिक कराडचे असंख्य कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर उभे आहेत, पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. वाल्मिक कराडचे कार्यकर्ते गर्दी करत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
हे ही वाचा : Astrology : वैशाख अमावस्येला शनीची गती बदलणार, 'या' राशीतील लोकांनी सावधानता बाळगावी
संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु
दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला जवळपास आता दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. याच प्रकरणाचा न्यायालयात खटला सुरु आहे. संबंधित प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह 5 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत, या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. पण, काही दिवसांपूर्वी तो मस्सजोगमध्ये येऊन गेल्याचं वक्तव्य मस्साजोगचे सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलं होतं.









