मुंबई : सराफ दुकानातून 7 कोटी 88 लाखांचे सोने चोरीला, कामगारांनीच डुप्लिकेट चावी करुन मारला डल्ला
Mumbai Crime News : बोरीवलीच्या आयसी कॉलनीतील 'माय गोल्ड पॉइंट' या दुकानात 13 आणि 14 जानेवारीच्या दरम्यान ही चोरी झाली. सकाळी जेव्हा दुकान उघडले, तेव्हा शोकेस रिकामे असल्याचे पाहून मालकाचे धाबे दणाणले. तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने गायब होते. विशेष म्हणजे दुकानाचा दरवाजा तोडलेला नव्हता, तर तो डुप्लिकेट चावीने उघडण्यात आला होता. यामुळे पोलिसांचा संशय सुरुवातीलाच दुकानातील व्यक्तींवर गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : सराफ दुकानातून 7 कोटी 88 लाखांचे सोने चोरीला
कामगारांनीच डुप्लिकेट चावी करुन मारला डल्ला
Mumbai Crime News, मुंबई: बोरीवली पश्चिम येथील एका नामांकित ज्वेलरी शॉपमध्ये तब्बल 7 कोटी 88 लाख रुपये किमतीचे सोने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत दोन आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून दुकानाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांनीच हा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
डुप्लिकेट चावीने उघडले दुकान
बोरीवलीच्या आयसी कॉलनीतील 'माय गोल्ड पॉइंट' या दुकानात 13 आणि 14 जानेवारीच्या दरम्यान ही चोरी झाली. सकाळी जेव्हा दुकान उघडले, तेव्हा शोकेस रिकामे असल्याचे पाहून मालकाचे धाबे दणाणले. तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने गायब होते. विशेष म्हणजे दुकानाचा दरवाजा तोडलेला नव्हता, तर तो डुप्लिकेट चावीने उघडण्यात आला होता. यामुळे पोलिसांचा संशय सुरुवातीलाच दुकानातील व्यक्तींवर गेला.
हेही वाचा : पालघरमध्ये मोठी दुर्घटना, विषारी वायू गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराट; 2600 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन
विश्वासू कर्मचाऱ्यांचाच घात
घटनेनंतर दुकानातील दोन कर्मचारी अचानक गायब झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाअंती असे लक्षात आले की, दुकानाची चावी ज्या कर्मचाऱ्यांकडे असायची, त्यांनीच त्याचा गैरफायदा घेतला. गणपत चदाना (वय 26) आणि किशनलाल उर्फ भैरू बगालाल रेबारी (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी बनावट चावी तयार करून मध्यरात्री दुकानात प्रवेश केला आणि कोट्यवधींचे दागिने लंपास केले.
