'आम्ही मिटवून टाकली भांडणं, आलो ना दोघं भाऊ एकत्र...' उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, पण...
आपल्यात असलेली भांडणं मिटवून एकत्र आलो असं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. ते आझाद मैदानावरील गिरणी कामगारांच्या मोर्चात बोलत होते.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईत एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे आझाद मैदानावर मात्र गिरणी कामगारांचं आंदोलन सुरू आहे. याच आंदोलकांना संबोधित करण्यासाठी स्वत: शिवसेना UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आझाद मैदानावर पोहचले. यावेळी उद्धव ठाकरे भाषण करताना पुन्हा एकदा मनसेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे.
एकीकडे राज ठाकरे यांनी अद्याप तरी युतीबाबत कोणतंही स्पष्ट विधान केलेलं नाही. एवढंच नव्हे तर आपल्या पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना मीडियाशी बोलायचं नाही असा आदेश दिला आहे. असं असताना उद्धव ठाकरे हे मात्र वारंवार आणि उघडपणे म्हणत आहेत की, 'आम्ही एकत्र आलोय..'
हे ही वाचा>> MNS-Shivsena UBT: 'मीडियाशी अजिबात बोलायचं नाही..', थेट आदेश, राज ठाकरेंच्या मनात चाललंय तरी काय?
अशावेळी आता उद्धव ठाकरे हे युतीसाठी तयार आहेत. पण अद्यापही राज ठाकरेंनी थेट कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मुंबईत आज दिल्लीच्या मालकाचे नोकर हे सत्तेत बसले आहेत. ते मुंबईतील गिरणी कामगार आणि मराठी माणूस हा मुंबईबाहेर काढायला आसूसलेला आहे. जग जिंकली तरी मुंबई पाहिजे.. का.. हे सत्ताधारी.. हे जे दोन व्यापारी तिकडे बसले आहेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. ती कोंबडी कापायला ते निघाले आहेत.










