मोठी बातमी: पवार कुटुंबाला मोठा धक्का! ED च्या आरोपपत्रात थेट रोहित पवारांचं नाव; काय आहे नेमकं प्रकरण?
ED files chargesheet against MLA Rohit Pawar: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCE) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध आता पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

Rohit Pawar ED Case: मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. हा रोहित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण रोहित पवार यांचं नाव आरोपी म्हणून चार्जशीटमध्ये घेण्यात आलं आहे.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर काही महिन्यांनी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने अद्याप आरोपपत्राची दखल घेतलेली नाही.
नेमकं प्रकरण काय?
ईडीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो आणि इतर संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. छाप्यांनंतर कर्जत-जामखेडचे आमदार पवार यांना ईडीच्या मुंबई कार्यालयात बोलावून चौकशी देखील करण्यात आली होती.
हे ही वाचा>> Rohit Pawar ईडीसमोर हजर, सुप्रिया सुळे प्रचंड चिडल्या
मार्च 2023 मध्ये, ईडीने बारामती अॅग्रोची 50.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती, ज्यामध्ये औरंगाबादमधील कन्नड येथे असलेली 161.30 एकर जमीन, एक साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारतींचा समावेश होता.