गोंदिया : रंग खेळून अंघोळीसाठी तलावावर गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Gondiya News : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज दि : 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी रंगपंचमीच्या सणादिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे. रंग खेळल्यानंतर दुपारदरम्यान तलावात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांची नावे समोर आलेली आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धुलीवंदनानंतर अंघोळीसाठी तलावात गेलेल्या मुलांचा पाण्यात बुडून अंत
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात सणादिवशीत दु:खद बातमी
Gondiya News : व्येकटेश दुडमवार - गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज दि : 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी धुलिवंदनादिवशी सणादिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे. रंग खेळल्यानंतर दुपारदरम्यान तलावात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांची नावे समोर आलेली आहेत, सागर गहाणे (वय 16) आणि प्रणय गहाणे (वय 13) अशी मृतकांची नावे आहेत. आनंदाच्या सणादिवशीत गावात शोक व्यक्त केला.
हे ही वाचा : नवऱ्याने बायकोचा अश्लील फोटोसह फोन नंबर सोशल मीडियावर केला शेअर, तिचा सौदा करत...
रंग खेळून अंघोळीसाठी तलावात गेलेल्या मुलांचा पाण्यात बुडून अंत
घडलेल्या घटनेनुसार, धुलिवंदन सणानिमित्त गावात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. दुपारी रंगात नाहून गेलेले दोन अल्पवयीन सागर आणि प्रणय हे अंघोळीसाठी तलावात गेले होते. अंघोळ करताना दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली होती, या घटनेनं गाव हादरून गेले आहे.
हे ही वाचा : मुंबई : सराफ दुकानातून 7 कोटी 88 लाखांचे सोने चोरीला, कामगारांनीच डुप्लिकेट चावी करुन मारला डल्ला
ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, संबंधित घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना कळवली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं आणि मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. दरम्यान, पोलिसांनी आकस्मित गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला.










