'शाहांचे पाय धुतले अन् सांगितलं आता तुम्ही मला..', शिंदेंची दिल्ली वारी अन् संजय राऊतांनी खळबळच उडवली!
Sanjay Raut Criticized to Sanjay Raut: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच झटपट दिल्ली दौरा केला. ज्यानंतर संजय राऊत यांनी अत्यंत बोचऱ्या शैलीत एकनाथ शिंदेंवर टीका केली. तसंच काही गंभीर दावेही त्यांनी यावेळी केली आहेत.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (10 जुलै) अचानक दिल्ली दौरा केला. ज्यावरून राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच आता शिवसेना (UBT)नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान करून प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. 'गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिंदेंनी दिल्लीत जाऊन अमित शाहांचे पाय धुतले, चंदन लावलं.. आणि नंतर सांगितलं आता मला मुख्यमंत्री करा..' असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंच्या दिल्लीवारीवरून बरीच टीका केली
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदेनी अमित शाहांचे पाय धुतले आणि चंदन लावून चाफ्याची फुलं वाहिली...'
'मुळात शिंदे हे पात्र आहे किंवा जो गट आहे.. तो या लोकांनी निर्माण केलं आहे. त्यांचे आदेश त्यांना पाळावेच लागतात. ते (शिंदे) काय शिवसेनाप्रमुखांच्या समाधी स्थळी जाऊन कौल लावत नाहीत.. की, आता काय करायचं? त्यामुळे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने 100 टक्के दिल्लीला जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता.'
हे ही वाचा>> 'श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस', शिरसाट बोलून गेले... अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला.. तुम्हाला क्रोनोलॉजी समजली का?
'मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ती अधिकृत माहिती देतो. यापूर्वी देखील मी त्यांच्या दिल्ली भेटीवर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी गुरूपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं. त्यांचं काय ते पाय धुण्याचं, फुलं.. पूजा-अर्चा. त्यानुसार कृष्ण मेनन मार्गावर अन्यत्र ते गेले. त्यांनी पूजा अर्चा केली अमित शहांची.. गुरू म्हणून.'
'त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली. मी सांगतो... त्यांच्या दोन्ही पायाला चंदन लावलं. हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. ते इतरही नेत्यांना भेटले.' अशा बोचऱ्या शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.










