गांगुलीनेही कधी विश्वचषक जिंकला नाही, तेंडुलकरलाही…; रवि शास्त्रींकडून कोहलीचा बचाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे गेल्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदही सोडलं. त्यानंतर कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीवरून कोहलीविरोधात टीकेचा सूरही उमटला. एकही आयसीसी चषक न जिंकल्याची टीका कोहली होत आहे. भारतीय संघाची माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रींनी भूमिका मांडत कोहलीची पाठराखण केली आहे.

ADVERTISEMENT

विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असताना रवि शास्त्री संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कार्यकाळ संपला. दरम्यान, माध्यमांशी बोलताना रवि शास्त्री यांनी कोहलीवर होत असलेल्या टीकेवर भूमिका मांडली.

विराटला कारणे दाखवा नोटीस? गांगुलीने फेटाळलं ‘ते’ वृत्त

हे वाचलं का?

कर्णधार म्हणून विराट कोहलीला एकही आयसीसी चषक जिंकता आला नाही, असा प्रश्न शास्त्री यांना विचारण्यात आला. त्यावर शास्त्री म्हणाले, ‘भारतीय संघातील अनेक मोठ्या खेळाडूंना विश्वचषकात विजय मिळवता आलेला नाही. सौरव गांगलीनेही विश्वचषक जिंकलेला नाही. राहुल द्रविडनेही कधीही विश्वचषक जिंकलेला नाही. लक्ष्मण, कुंबळे, रोहित शर्मानेही विश्वचषक जिंकलेला नाही. याचा अर्थ असा होत नाही की, ते सगळे चांगले खेळाडू नाहीत. सचिन तेंडुलकरलाही विश्वचषक जिंकण्यासाठी ६ विश्वचषक खेळावे लागले’, असं रवि शास्त्री म्हणाले.

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या Legends League Cricket दरम्यान माध्यमांशी संवाद साधला. ‘भारतीय क्रिकेट संघाजवळ विश्वचषक जिंकणारे दोनच कर्णधार आहेत. तुम्ही नेहमी जिंकण्यासाठीच जात असता. केवळ विश्वचषक जिंकण्यावरूनच खेळाडूंचं मूल्यमापन व्हायला नको. एक खेळाडू म्हणून तुमची कारकीर्द कशी राहिली. किती काळ आपण खेळलात आणि खेळाडूचं मूल्यमापन त्याच्या खेळावरूनच व्हायला हवं,’ असं रवि शास्त्री म्हणाले.

ADVERTISEMENT

विराट कोहलीच्या राजीनामा पत्रात फक्त दोन नावांचा उल्लेख, पद सोडताना नेमकं काय म्हणाला कोहली?

ADVERTISEMENT

भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा विराट कोहलीकडे असताना भारत २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभूत झाला. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत, तर २०२१ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत साखळी सामन्यातूनच बाहेर पडला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT