संजू सॅमसनला आयर्लंड देशाकडून खेळण्याची ऑफर; प्रस्तावावर त्यानं दिलं हे उत्तर
टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला सतत खेळण्याची संधी मिळत नाहीये. संजू सॅमसनने 2015 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तरीही तो एकूण 27 सामने खेळू शकला आहे. सतत संघातून वगळल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयलाही टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने सॅमसनला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली आहे. संजू […]
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला सतत खेळण्याची संधी मिळत नाहीये. संजू सॅमसनने 2015 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तरीही तो एकूण 27 सामने खेळू शकला आहे. सतत संघातून वगळल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयलाही टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने सॅमसनला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली आहे.
ADVERTISEMENT
संजू सॅमसनने दिलं हे उत्तर
इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने संजू सॅमसनला आश्वासन दिले आहे की जर तो त्याच्या क्रिकेट करिअरसाठी त्यांच्या देशात आला तर तो सर्व सामन्यांमध्ये खेळेल. सॅमसनने आयरिश क्रिकेट बोर्डाची ऑफर नाकारली आणि म्हणाला की, आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कोणत्याही देशाकडून खेळण्याचा विचार करणार नाही कारण त्याला भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे.
आयरिश क्रिकेट बोर्ड (क्रिकेट आयर्लंड) अशा खेळाडूच्या शोधात आहे जो उत्कृष्ट फलंदाजीसह कॅप्टनसी करू शकेल. संजू सॅमसनने ही ऑफर स्वीकारली असती तर त्याला भारतीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगला अलविदा म्हणावं लागलं असतं. भारतीय अंडर-19 संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदनेही असाच मार्ग अवलंबला आणि आता तो अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे.
हे वाचलं का?
T20 वर्ल्ड कपमध्ये संघातून बाहेर होता सॅमसन
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक आणि आशिया कप 2022 साठी भारतीय संघात संजू सॅमसनची निवड झाली नाही. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सॅमसन भारतीय संघाचा भाग नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सॅमसनचा संघात निश्चितपणे समावेश करण्यात आला असला तरी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत संजू सॅमसन चांगल्या टचमध्ये दिसला. सॅमसनने पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 86 धावा करत भारताला जवळपास विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे नाबाद 30 आणि 2 धावा केल्या. ती मालिका २-१ ने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले होते.
ADVERTISEMENT
संजू सॅमसनचा अंतरराष्ट्रीय रेकॉर्ड
28 वर्षीय संजू सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 21.14 च्या सरासरीने आणि 135.15 च्या स्ट्राइक रेटने 296 धावा केल्या आहेत. संजूने केवळ 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या 66 च्या सरासरीने 330 धावा आहेत. ऋषभ पंतसारख्या खेळाडूच्या तुलनेत संजू सॅमसनला भारताकडून खेळण्यासाठी फार कमी संधी मिळाल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT