सौरव गांगुलीवर आज पुन्हा होणार शस्त्रक्रिया
बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला बुधवारी पुन्हा रूग्णालयात दाखल केलं. छातीत दुखत असल्याचा त्रास जाणवत असल्याने त्याला पुन्हा रूग्णालयात दाखल केलं. तर आज सौरव गांगुली यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असून अजून एक स्टेंट टाकला जाणार आहे. डॉ. देवी शेट्टी यांच्या देखरेखीखाली गांगुलीच्या रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकला जाणार असल्याचं वुडलँड रूग्णालयाकडून सांगण्यात आलंय. […]
ADVERTISEMENT
बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला बुधवारी पुन्हा रूग्णालयात दाखल केलं. छातीत दुखत असल्याचा त्रास जाणवत असल्याने त्याला पुन्हा रूग्णालयात दाखल केलं. तर आज सौरव गांगुली यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असून अजून एक स्टेंट टाकला जाणार आहे.
ADVERTISEMENT
डॉ. देवी शेट्टी यांच्या देखरेखीखाली गांगुलीच्या रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकला जाणार असल्याचं वुडलँड रूग्णालयाकडून सांगण्यात आलंय. सौरव गांगुलीला कोलकात्यातील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी गांगुलीच्या छातीत दुखत असल्याने त्याला रूग्णालयात दाखल केलं गेलं होतं. त्यावेळी गांगुलीची एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती. त्यांनंतर काही दिवस रूग्णालयात देखरेखीखाली ठेवल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर काल म्हणजे बुधवारी पुन्हा छातीत दुखल्याची तक्रार जाणवत असल्याने त्याला रूग्णालयात दाखल केलंय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT