SA vs IND : जोहान्सबर्ग कसोटीत आफ्रिकेची बाजी, डीन एल्गरची कर्णधाराला साजेशी खेळी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सेंच्युरिअन कसोटी सामना जिंकून मालिकेची धडाकेबाज सुरुवात केलेल्या भारतीय संघाचं विमान दुसऱ्याच कसोटी सामन्यात जमिनीवर आलं आहे. डीन एल्गरच्या संयमी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात भारतावर ७ विकेट राखून मात केली आहे. या विजयासह आफ्रिकेने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून या मालिकेचा निकाल आता केप टाऊनमध्ये लागणार आहे.

ADVERTISEMENT

दुसऱ्या डावात भारताने २६६ धावांपर्यंत मजल मारत आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचं आव्हान दिलं. जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांचा निभाव लागणार नाही असा अंदाज सर्वांनी बांधला होता. परंतू आफ्रिकेने हे सर्व अंदाज फोल ठरवले. तिसऱ्या दिवसाअखेरीसच आफ्रिकेने दोन गडी गमावत ११८ धावांपर्यंत मजल मारली होती. जोहान्सबर्गमध्ये भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एकही कसोटी सामना हरलेला नव्हता. परंतू डीन एल्गरच्या संघाने आजच्या दिवशी हा इतिहास बदलून टाकला आहे.

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे जवळपास पहिल्या दोन सत्रांचा खेळ वाया गेला. परंतू यानंतर पावसाने उसंत घेतल्यानंतर उरलेल्या दिवसात ३४ षटकांचा खेळ खेळवण्याचं ठरलं. परंतू विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाकडे अनुभवाची कमतरता जाणवली. आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करत संघाची पडझड होणार नाही याची काळजी घेतली. पहिल्या डावात ७ बळी घेणाऱ्या शार्दुल ठाकूरला कर्णधार लोकेश राहुलने पहिल्या तासात गोलंदाजीची संधीच दिली नाही. शमी, आश्विन आणि बुमराह या त्रिकुटाने सुरुवातीच्या तासांत गोलंदाजी केली. परंतू डीन एल्गर आणि व्हॅन डर डसेन यांना आऊट करण्यात त्यांना यश आलं नाही.

हे वाचलं का?

एल्गर आणि डसेन यांनी सुरेख फटकेबाजी करत चौथ्या दिवशीच संघाला विजय मिळेल याची खात्री घेतली. मोहम्मद शमीने डसेनला आऊट करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. टेंबा बावुमा आणि एल्गर जोडीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. डीन एल्गरने नाबाद ९६ धावांची खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या डावात भारताकडून शमी, आश्विन आणि ठाकूरने १-१ बळी घेतला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT