Ind vs Pak : पटाखे तो फुटने से रहें…मौका मौका वाला ‘तो’ परतलाय, व्हिडीओ पाहिलात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१७ ऑक्टोबरपासून युएईत टी-२० विश्वचषकाला सुरुवात होते आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना हा २४ ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. सध्या हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धांचा अपवाद वगळता एकमेकांशी खेळत नाहीत. भारत-पाकिस्तानचे सामने म्हटलं की क्रिकेट चाहत्यांना आठवण येते ती म्हणजे गाजलेल्या मौका-मौका या जाहीरातीची.

ADVERTISEMENT

यंदाच्या टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यानिमीत्ताने मौका-मौका जाहीरातीमधला तो पाकिस्तानी व्यक्ती पुन्हा एकदा समोर आला आहे. दुबईच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी ही जाहीरात चित्रीत करण्यात आली असून सोशल मीडियावर या जाहीरातीला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. तुम्ही पाहिलात की नाही व्हिडीओ?…

भारताने ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट क्षणार्धात कोसळेल – PCB प्रमुख रमीझ राजांनी व्यक्त केली भीती

हे वाचलं का?

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताला आतापर्यंत एकदाही हरवू शकलेला नाहीये. या पार्श्वभूमीवर जाहीरातीमधला एक पाकिस्तानी तरुण जो कित्येक वर्ष फटाके फोडण्याच्या तयारीत आहे पण त्याला ती संधीच मिळत नाहीये, अशी ही जाहीरात आहे.

T-20 World Cup : भारताला हरवण्यासाठी पाक संघाला खास ऑफर, सामना जिंका ब्लँक चेक देतो…!

ADVERTISEMENT

यंदाच्या टी-२० विश्वचषकाचं यजमानपद हे भारताकडे आहे. परंतू कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि भारत-पाकिस्तानमधले बिघडलेले राजकीय संबंध यामुळे ही स्पर्धा बीसीसीआयने युएईत खेळवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला यंदा जिंकण्याचा मौका मिळतो की भारत पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवतो हे पाहणं क्रिकेट रसिकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

T-20 World Cup : भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा लूक पाहिलात का? BCCI ने शेअर केला फोटो

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT