Tokyo Olympics 2020 : Gold Medal च्या शर्यतीतून भारत आऊट, बेल्जिअमने उडवला धुव्वा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी खेळण्याचं भारतीय हॉकी संघाचं स्वप्न अखेरीस संपुष्टात आलेलं आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जिअमने भारतावर ५-२ च्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये भारताकडे २-१ अशी आघाडी होती. परंतू यानंतर बेल्जिअमने आपल्या आक्रमणाची धार वाढवत भारताला बॅकफूटला ढकलत सामन्यात बाजी मारली. भारतीय हॉकी संघाला आता ब्राँझ मेडलसाठी खेळावं लागणार […]
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी खेळण्याचं भारतीय हॉकी संघाचं स्वप्न अखेरीस संपुष्टात आलेलं आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जिअमने भारतावर ५-२ च्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये भारताकडे २-१ अशी आघाडी होती. परंतू यानंतर बेल्जिअमने आपल्या आक्रमणाची धार वाढवत भारताला बॅकफूटला ढकलत सामन्यात बाजी मारली. भारतीय हॉकी संघाला आता ब्राँझ मेडलसाठी खेळावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जिअमच्या संघाचं पारडं जड मानलं जात होतं. या अंदाजानुसार पहिल्या सत्रातील पाच मिनीटं बेल्जिअमच्या संघाने आक्रमक हॉकी खेळली. दुसऱ्याच मिनीटाला बेल्जिअमच्या लोइक ल्युपारेटने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. परंतू भारतीय संघ यामुळे दबावाखाली आलेला पहायला मिळाला नाही. सातव्या मिनीटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं सोन करत बॉल गोलपोस्टच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यातून आत ढकलला. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मनप्रीत सिंगने मैदानी गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
पहिल्या सत्रावर भारताने अनपेक्षितरित्या वर्चस्व गाजवल्यानंतर बेल्जिअमचा संघ थोडासा बॅकफूटला गेला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासूनच बेल्जिअमने आक्रमणाची धार वाढवली. डाव्या बाजूला बचावफळीतील त्रुटीचा फायदा घेत बेल्जिअमने भारताच्या गोलपोस्टवर हल्ले केले. ज्यानंतर पेनल्टी कॉर्नरवर बेल्जिअमला लागोपाठ ३-४ संधी मिळाल्या. यापैकी एका संधीचं अलेक्झांडर हेंड्रीक्सने गोलमध्ये रुपांतर करत बेल्जिअमला २-२ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात सामन्याचं पारडं दोन्ही संघांच्या दिशेने झुकताना पहायला मिळालं. अखेरीस मध्यांतरापर्यंत सामना २-२ अशा बरोबरीत पहायला मिळाला.
हे वाचलं का?
तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी काही सुरेख चाली रचत एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतू गोल करण्याचे त्यांचे प्रयत्न हो तोकडेच पडले. भारतीय बचावफळीने अखेरच्या काही मिनीटांमध्ये बेल्जिअमला वरचढ होण्याची संधी दिली नाही ज्यामुळे तिसरं सत्र विनागोल पहायला मिळालं.
चौथ्या सत्रात बेल्जिअमने सामन्याची सर्व सुत्र आपल्या हाती घेतली. भारतीय गोलपोस्टवर सातत्याने आक्रमक सुरु ठेवत बेल्जिअमने भारताला कायम दबावाखाली ठेवलं. चौथ्या आणि अखेरच्या सत्रात खेळाला सुरुवात झाल्यानंतर बेल्जिअमने ५-८ मिनीटांच्या अंतरात सातत्याने पेनल्टी कॉर्नरची कमाई केली. यापैकी ४९ व्या मिनीटाला आणि ५३ व्या मिनीटाला गोल करत अलेक्झांडर हेंड्रिक्सने बेल्जिअमची आघाडी ४-२ अशी वाढवली. यानंतर भारतीय खेळाडूंची सामन्यातली लय बिघडलेली पहायला मिळाली. भारताच्या बचावफळीत शिथीलता आल्यामुळे बेल्जिअमने आक्रमणाची धार वाढवत आपले हल्ले सुरुच ठेवले. दुसरीकडे भारतीय खेळाडू बेल्जिअमवर प्रतिहल्ला करण्यात पूरते अपयशी ठरताना दिसले. अखेरच्या काही क्षणांमध्ये भारताने श्रीजेशला मैदानावरुन हटवत आक्रमणात आणखी एक माणूस वाढवला. परंतू बेल्जिअमने याचा फायदा उचलत आणखी एक गोल डागत भारताच्या उरल्या सुरल्या सर्व आशा संपुष्टात आणल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT