Tokyo Paralympics : भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक, सुमीत अंतिलच्या भाल्याने घेतला ‘सुवर्णवेध’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा डंका चांगलाच वाजतो आहे. भालाफेकीच्या F64 प्रकारात भारताच्या सुमीत अंतिलने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यंदाच्या स्पर्धेतलं भारताचं हे दुसरं गोल्ड मेडल ठरलं आहे. आज सकाळी नेमबाजीत भारताच्या अवनी लेखराने सुवर्णपदकाची कमाई केली होती.

ADVERTISEMENT

आतापर्यंत या स्पर्धेत भारताने ७ पदकांची कमाई केली असून, रविवारी विनोद कुमारने जिंकलेलं ब्राँझ पदक रद्द करण्यात आल्यानंतर सुमीतने थेट सुवर्णपदावर नेम साधत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. २०१६ साली रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने ४ पदकांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ७ पदकं जमा झाली असून यंदा भारत दोन आकडी पदकं मिळवणार अशी चिन्ह दिसत आहेत.

सुमीतने सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर त्याच्या गावी हरियाणात घरच्या लोकांनी आणि मित्र परिवाराने जल्लोष सुरु केला.

हे वाचलं का?

६८.५५ मी. लांब भाला फेकत सुमीतने जागतिक विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. २३ वर्षीय सुमीत हरियाणाच्या सोनेपतचा राहणाचा आहे. २०१५ साली मोटारसायकल अपघातात सुमीतचा गुडघ्यापासून पायाचा खालचा भाग हा निकामी झाला होता. आपल्या सहाव्या प्रयत्नात सुमीतने जागतिक विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

Tokyo Paralympics: भारताच्या अवनी लेखराचा सुवर्णवेध, 10 मी. शूटिंग स्पर्धेत Gold Medal

ADVERTISEMENT

सुमीतने या स्पर्धेत आपला याआधीचा ६२.८८ मी. चा विक्रमही मोडीत काढला. अंतिम फेरीतल्या सात प्रयत्नांमध्ये सुमीतची कामगिरी काहीशी अशी होती. –

ADVERTISEMENT

६६.९५ मी, ६८.०८ मी, ६५.२७ मी, ६६.७१ मी, ६८.५५ मी, फाऊल

ऑस्ट्रेलियाच्या मायकल ब्युरिअनने ६६.२९ मी. सह रौप्य तर श्रीलंकेच्या दुलानने ६५.६१ मी. लांब भाला फेकत कांस्य पदकाची कमाई केली. त्याआधी आजच भालाफेकीत भारताच्या देवेंद्र झाजरिया आणि सुंदरसिंग गुर्जरने रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली होती.

Tokyo Paralympics : भारतीय खेळाडूंच्या भाल्याने घेतला पदकाचा वेध, देवेंद्र झाजरियाला रौप्यपदक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT