Indian Cricket टीमधील दोघांना इंग्लंडमध्ये Corona संसर्ग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंग्लंड विरोधात सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजच्या आधी भारतीय क्रिकेट संघाची चिंता वाढली आहे. कारण टीम इंडियाच्या दोघांना इंग्लंडमध्ये कोरोना संसर्ग झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया ब्रेकवर आहे. अशात इंग्लंड आणि भारत यांच्यात टेस्ट सीरिज होणार आहे. मात्र त्याआधीच दोन खेळाडूंना कोरोना झाला असल्याची माहिती ANI ने दिली आहे.

ADVERTISEMENT

या दोन खेळाडूंना थंडी वाजणं, खोकला यांसारखी लक्षणं जाणवत होती त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे. आता यापैकी एकाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दुसऱ्या खेळाडूची कोरोना चाचणी तीन दिवसांनी म्हणजेच 18 जुलैला करण्यात येणार आहे. तोपर्यंत त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 18 जुलैला आयसोलेशनमध्ये या खेळाडूचा दहावा दिवस असणार आहे.

18 जुलैला जर या खेळाडूची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर तो टीमसोबत कॅम्पमध्ये सहभागी होईल. टीम इंडियाचे इतर खेळाडू हे लंडनमध्ये आले आहेत. ते डरहमला जाणार आहेत. मात्र जो खेळाडू पॉझिटिव्ह आहे तो मात्र त्यांच्यासोबत जाणार नाही. याआधी सगळ्या खेळाडूंची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. आज तकला मिळालेल्या माहितीनुसार या खेळाडूंना 3-4 दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. बीसीसीआयने या टीम इंडियाला पत्र लिहिलं आहे आणि कोणीही खेळाडू विम्बल्डन पाहण्यासाठी जाणार नाही हे सांगितलं आहे.

हे वाचलं का?

20 जुलैपासून सराव सामने

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडच्या टेस्ट सीरिजवर याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण सगळे खेळाडू फिट अँड फाईन आहेत. तसंच नियमांचं पालन करूनच ते प्रॅक्टीसही करत आहेत. इंग्लंडच्या विरोधात पहिली टेस्ट मॅच ऑगस्ट महिन्यात खेळली जाणार आहे. त्याआधी 20 जुलैपासून तीन दिवसीय सराव सामना होणार आहे.

ADVERTISEMENT

BCCI आणि Team India च्या मॅनेजमेंटमधला विसंवाद चव्हाट्यावर

ADVERTISEMENT

दुखापतग्रस्त शुबमन गिल ऐवजी दुसऱ्या खेळाडूला इंग्लंडमध्ये पाठवा अशी मागणी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने बीसीसीआयच्या निवड समितीला केली होती. परंतू निवड समितीने ही मागणी धुडकावून लावत इंग्लंडमध्ये तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत असं उत्तर दिलं.जेव्हा तुम्ही कोणत्याही दौऱ्यावर असता आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज लागत असेल तर त्यासाठी तुम्ही सचिन किंवा सीईओ यांना संपर्क साधणं गरजेचं आहे. हा टीम इंडियाचा दौरा आहे कोणताही खासगी दौरा नाही हे मॅनेजमेंटने लक्षात घ्यायला हवं अशा शब्दांत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आपली नाराजी व्यक्त केली होती. 9 जुलैला हा विसंवाद समोर आला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT