Ind vs NZ : ऋषभ पंत ठरणार भारतासाठी प्लस पॉईंट, जाणून घ्या WTC मधली त्याची आतापर्यंतची कामगिरी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाविरुद्ध साऊदम्प्टनच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपली Playing XI जाहीर केली असून यात विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पसंती देण्यात आली आहे. काही वर्षापूर्वी आपल्या बेजबाबदार बॅटींगमुळे चर्चेत असलेल्या ऋषभ पंतमध्ये झालेला बदल […]
ADVERTISEMENT
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाविरुद्ध साऊदम्प्टनच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपली Playing XI जाहीर केली असून यात विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पसंती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
काही वर्षापूर्वी आपल्या बेजबाबदार बॅटींगमुळे चर्चेत असलेल्या ऋषभ पंतमध्ये झालेला बदल हा नक्कीच वाखणण्याजोगा आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेत त्याने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करत ऋषभ पंत सामन्याचं पारडच हलवून टाकतो.
हे वाचलं का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये ऋषभ पंतने आतापर्यंत ११ मॅच खेळल्या असून ज्यात त्याने ४१.३७ च्या सरासरीने ६६२ रन्स केल्या आहेत. ज्यात पंतने ४ अर्धशतकं आणि एक शतकही लगावलं आहे. त्याचा या स्पर्धेतला सर्वोत्तम स्कोअर १०१ आहे. अंतिम सामन्यातही त्याचं संघात असणं भारतासाठी फायदेशीरच ठरणार आहे, जाणून घेऊयात त्याची या स्पर्धेतली आतापर्यंतची कामगिरी…
१) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – २ मॅचमध्ये ५८ रन्स
ADVERTISEMENT
या सिरीजमध्ये ऋषभला आपली चमक दाखवता आली नाही. १९.३३ च्या सरासरीने तो या सिरीजमध्ये रन्स काढू शकला. या मालिकेत त्याचा सर्वोत्तम स्कोअर २७ होता पण विकेटकिपींग करताना त्याने ११ कॅच घेत आपली चमक दाखवली.
ADVERTISEMENT
WTC Final : पाऊस क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर पाणी फिरवणार? जाणून घ्या Southampton मधला हवामानाचा अंदाज
२) भारत विरुद्ध न्यूझीलंड – २ मॅचमध्ये ६० रन्स
संपूर्ण टीम इंडियासोबत ऋषभ पंतसाठीही हा दौरा खडतर होता. पंत या मालिकेत १५ च्या सरासरीने ६० धावा काढू शकला. त्याचा सर्वोत्तम स्कोअर होता २५ तर विकेटकिपींग करताना त्याने ८ कॅच पकडले.
३) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ३ मॅचमध्ये २७४ रन्स
या दौऱ्यापासून ऋषभ पंतचं एक वेगळंच रुप जगासमोर आलं. पहिला सामना गमावल्यानंतर भारताने दमदार कमबॅक करत २-१ ने मालिका जिंकली. ऋषभ पंतच्या योगदानामुळे चौथी टेस्ट मॅच ड्रॉ करण्यात आणि पाचवी टेस्ट मॅच जिंकण्यात भारताला यश आलं. ६८.५० च्या सरासरीने या सिरीजमध्ये पंतने रन्स काढल्या. या सिरीजमध्ये २ अर्धशतकांच्या जोरावर पंतने २७४ रन्स काढल्या. गॅबाच्या मैदानावर खेळलेली नाबाद ८९ रन्सची इनिंग ही सर्वोत्तम इनिंग होती.
४) भारत विरुद्ध इंग्लंड – ४ मॅचमध्ये २७० रन्स
घरच्या मैदानावर खेळत असताना भारताने इंग्लंडवर ३-१ ने मात करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं होतं. ही सिरीजही ऋषभ पंतसाठी चांगली गेली. रोहित शर्मानंतर या मालिकेत सर्वाधिक रन्स काढण्याचा मान ऋषभने पटकावला. ५४ च्या सरासरीने पंतने या सिरीजमध्ये २७० रन्स काढल्या. अखेरच्या कसोटीत त्याने १०१ रन्सची इनिंग खेळली. याव्यतिरीक्त विकेटकिपींग करताना ८ कॅच आणि ५ स्टम्पिंग करण्यात पंत यशस्वी ठरला.
WTC Final : विराट विरुद्ध विल्यमसन, आतापर्यंतच्या करिअरमध्ये कोणाची आकडेवारी सरस?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT