WTC Final : दिवसाअखेरीस भारताची शतकी मजल, अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या सेशनमधला खेळ वाया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या दुसऱ्या दिवशी भारताने ३ विकेट गमावत १४६ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. परंतू दुसऱ्या दिवशीही बराचसा वेळ हा अंधुक प्रकाशामुळे वाया गेला. संपूर्ण दिवसभरात ६४.४ ओव्हर्सचा खेळ झाला.

ADVERTISEMENT

टॉस जिंकून न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. नवीन बॉलचा फायदा उचलण्यात न्यूझीलंडचे बॉलर अपयशी ठरले. पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांमध्ये ६२ रन्सची पार्टनरशीप झाली. अखेरीस जेमिसनने रोहित शर्माला ३४ रन्सवर आऊट करत भारताला पहिला धक्का दिला.

WTC Final : न्यूझीलंडने DRS चा निर्णय घेतला नाही तरीही पंच थर्ड अंपायरकडे गेले, विराटही चक्रावला

हे वाचलं का?

दुसरीकडे ठराविक अंतराने शुबमन गिलही वॅगनरच्या बॉलिंगवर २८ रन्स काढून आऊट झाला. चेतेश्वर पुजाराच्या सहाय्याने विराट कोहलीने दुसरं सेशन खेळून काढलं. चेतेश्वर पुजाराने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत न्यूझीलंडच्या बॉलर्सना थकवलं. पुजाराने पहिला रन काढण्यासाठी तब्बल ३४ बॉल्स घेतले. परंतू ट्रेन्ट बोल्टने पुजाराला झटपट आऊट करत भारताला तिसरा धक्का दिला.

WTC Final : विराट कोहलीचा विक्रम, दिग्गज कॅप्टन्सना टाकलं मागे

ADVERTISEMENT

यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताचा डाव सावरत संघाला शतकी टप्पा ओलांडून दिला. यानंतर वारंवार अंधुक प्रकाशामुळे अंपायर्सची खेळ मध्येच थांबवला. अखेरीस दिवसाचा खेळ संपायला अर्धा तास बाकी असताना अंपायर्सनी उर्वरित खेळ रद्द केल्याचं जाहीर केलं. दिवसाअखेरीस विराट कोहली ४४ तर अजिंक्य रहाणे २९ रन्सवर खेळत होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT