अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाचा धुमधडाक्यात कार्यक्रम सुरु झाले आहेत.

गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत-राधिका प्री-वेडिंग इव्हेंट मोठ्या उत्साहात सुरु असून हा विवाह समारंभ 3 मार्चपर्यंत चालणार आहे.

अनंत अंबानीचे राधिका मर्चंटसोबत लग्न जुळाल्यापासून त्यांच्या लग्नाची चर्चा ही देशाबरोबरच परदेशातही चालू आहे. त्यामुळे अंबानींच्या या कौटुंबीक उत्साहात अनेक जगप्रसिद्ध व्यक्तीही सहभागी होत आहेत.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी याचे धीरूभाई अंबाई इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षण घेतले आहे. 

इंटरनॅशनल स्कुलमधील शिक्षण पूर्ण करून अनंत अंबानी पदवीत्त्युरचे शिक्षण घेण्यासाठीअमेरिकेतील Brown University मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्याने थेट Reliance मध्येच नोकरी केली.

अनंत अंबानी याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्याकडे जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स बोर्डवर जबाबदारी देण्यात आली होती, त्यानंतर त्यांची जबाबदारी आणखी वाढवण्यात आली.

याशिवाय तो जिओ आणि रिलायन्स रिटेल बोर्डातही सामील आहे. 12 जुलै रोजी अनंत राधिका मर्चंटसोबत सात फेऱ्या मारून ती विवाह समारंभ पार पडणार आहे.

पुढील वेब स्टोरी

कॉकटेल पार्टीत राधिकाचा 'स्टनिंग लूक', तुम्ही पाहिलात का तिचे फोटो?

इथे क्लिक करा