Photo Credit FACEBOOK

Arrow

'पतीने माझ्याकडून 10 हजार उसने घेतले अन् Infosys...', सुधा मूर्तींनी सांगितली कहाणी..

Arrow

इन्फोसिस ही भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. 

Arrow

कंपनीचे संस्थापक एन आर नारायण यांनी 1981 मध्ये 6 सहकारी अभियंत्यांसोबत मर्यादित संसाधनांसह इन्फोसिसची स्थापना केली.

Arrow

1999 मध्ये, इन्फोसिस अमेरिकन स्टॉक मार्केट Nasdaq वर सूचीबद्ध झाली. हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय कंपनी होती.

Arrow

ज्यावेळी नारायण मूर्तींना कंपनी स्थापन करण्यासाठी पैशांची गरज होती त्यावेळी त्यांनी पत्नीकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते.

Arrow

नारायण मूर्ती यांच्या पत्नीचे नाव सुधा मूर्ती आहे.

Arrow

जेव्हा सुधा मूर्ती यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की, '10 हजार रुपये देताना तुम्हाला काय वाटले?'

Arrow

यावर सुधा मूर्ती म्हणाल्या, 'माझं लग्न झाल्यावर माझ्या आईने मला शिकवला होतं की काही पैसे स्वत: जवळही ठेवले पाहिजेत.'

Arrow

'मूर्ती आणि माझ्या पगारातून मी दर महिन्याला काही पैसे बाजूला काढायचे. त्यांना ते माहित नव्हते.असे करत 10 हजार 250 रुपये जमा झाले.'

Arrow

'एकेदिवशी मूर्ती यांनी मला त्यांचं स्वप्न सांगितलं आणि म्हणाले मला माहित नाही की ते खरे होईल की नाही, पण मला ते करायचे आहे.'

Arrow

सुधा मूर्ती पुढे म्हणाल्या, 'मला माहित होतं की ते मेहनती आहेत. जर मी त्यावेळी पैसे दिले नसते तर ते खचले असते.' 

Arrow

'मूर्ती यामध्ये अपयशी ठरले असते तर त्यांना पुन्हा नोकरी मिळाली असती. यामुळे मी त्यांना 10हजार रुपये दिले आणि 250 रुपये माझ्याकडे ठेवले.'

Arrow

अलीकडेच, सुधा मूर्ती यांना भारतातील तिसरा सर्वोच्च सन्मान पद्मभूषण प्रदान करण्यात आला आहे.

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर पडता-पडता वाचली, सुंदर ड्रेसमुळे झाली असती फजिती

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा