सलमान खानने टीम इंडियाला दिला शब्द, म्हणाला पार्टी...
विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच टीम इंडियाच हा सामना जिंकणार असल्याचा विश्वास सलमान खानने दिला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज वर्ल्ड कप फायनलचा ऐतिहासिक सामना होत आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांपासून ते सगळ्या बॉलिवूडकडून टीम इंडियाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांनीही भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देत यावेळी विश्वचषकाची ही ट्रॉफी आमचीच असेल असा विश्वास त्यांनी दिला आहे.
मॅचपूर्वी स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या सलमान आणि कतरिनाने वर्ल्डकपबद्दल आनंद व्यक्त करत या सर्वांनी विराट कोहलीचे कौतुकही केले आहे.
हरभजनने तर सलमानला म्हटले आहे की, टीम इंडिया जिंकली तर विजयाची पार्टी तुझ्या घरी होईल का? असा सवाल करताच सलमान म्हणाला की, नक्कीच तुमच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे सदैव उघडे आहेत.
तर हरभजनने सलमानबरोबरच कतरिनालाही शब्द दिला आहे. यावेळी त्यांना तो म्हणाला की आता या सामन्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. त्यावरही सलमानने सांगितले की, आतापर्यंतचे सगळे सामने आपण जिंकले आहेत. त्यामुळे हा सामनाही आम्हीच जिंकणार असा विश्वास त्याने बोलून दाखवला आहे.
यावेळी सलमानने आपल्या वडिलांची आठवण सांगत म्हटले आहे माझ्या वडिलांनी म्हटले होते की, जर मी क्रिकेटर असतो तर 30 वर्षांपूर्वी माझे करिअर संपले असते.
सलमानने विराट कोहलीचेही कौतुक करत खेळातील त्याचे प्रयत्नही त्याने सांगितले आहेत. त्यावर तो म्हणाला की, त्याच्या अथक प्रयत्नामुळेच त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रमही त्याने मोडला आहे.
कतरिनानेही विराटचे कौतुक करत तो अनेकांचे तो प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे.
वर्ल्ड कप फायनलच्या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सही अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे आता फक्त सर्वांना प्रतीक्षा आहे ती त्या ट्रॉफीची.
‘भारताने विश्वचषक जिंकला तर मी न्यूड स्ट्रिप…’, आता पूनम पांडे आहे तरी कुठे?