Photo Credit; instagram

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...

Photo Credit; instagram

'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत काव्याची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लग्न बंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

ज्ञानदाने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

तसेच, अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा हातात हात घेत असतानाचा व्हिडीओ सुद्धा पोस्ट केला आहे. तिच्या हातावर मेहंदी अन् हिरवा बांगड्यांचा चुडा पाहायला मिळत आहे.

Photo Credit; instagram

हा व्हिडीओ शेअर करताना तिने "ठरंल... कळवतो लवकरच # HD Love" असं कॅप्शन दिल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

ज्ञानदाने अजूनही तिच्या नवऱ्याचं नाव चाहत्यांसमोर आणलं नसून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव H अक्षरावरून सुरू होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Photo Credit; instagram

ज्ञानदा रामतीर्थकर ही विवाहबंधनात अडकणार असल्याची पोस्ट पाहून चाहत्यांनी यावर बऱ्याच कमेंट्स आणि प्रतिक्रिया दिल्याचं दिसून येत आहे. 

पुढील वेब स्टोरी

डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...

इथे क्लिक करा