6 वर्षांच्या मुलीची आई असलेल्या 47 वर्षीय अभिनेत्रीने केले गुपचूप लग्न
अभिनेत्री माही गिल तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की, ती विवाहित असूनही तिने ते गुपित ठेवले आहे.
माही गिलने अभिनेता आणि उद्योजक रवी केसरशी लग्न केले आहे. दोघांनी 2019 मध्ये एका वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले होते.
आता माही गिल पती रवी केसर आणि 6 वर्षांच्या मुलीसोबत गोव्यात राहते.
माही आणि रवी केसर गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहेत, पण लग्न झाल्याचे त्यांनी गुपित ठेवले.
माही यावर म्हणाली, 'हो मी त्याच्याशी लग्न केले आहे. पण यापेक्षा अधिक तिने काहीही सांगितलेले नाहीये.'
माही गिलला तिचे वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडते. 2019 मध्ये तिने जाहीर केले होते की तिला अडीच वर्षांची मुलगी आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.
पण एका जुन्या मुलाखतीत जेव्हा अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली होती, 'मला लग्न करण्याची काय गरज आहे?'
'मी आनंदी आहे. मला वाटतं लग्न न करताही लोक आनंदी राहू शकतात. लग्नाशिवायही मुले आणि कुटुंब असू शकते.'
माही गिलबद्दल सांगायचे तर तिने 'दबंग 2' मध्ये अरबाज खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिला छोट्या भूमिकाच मिळाल्या.