Photo Credit; instagram

मुलगा झाल्यानंतर अभिनेत्रीचा Kissing सीनला नकार, म्हणाली "माझ्या नवऱ्याला..."

Photo Credit; instagram

अनिता हसनंदानी ही टीव्ही इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने 'नागिन', 'ये है मोहब्बते' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Photo Credit; instagram

अनिताने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांवर चांगलीच छाप पाडली आहे. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं.

Photo Credit; instagram

आता अनिताने पडद्यावर Kissing सीन देण्यासाठी कम्फर्टेबल नसल्याचं सांगितलं आहे. अनिताला 'इंस्टंट बॉलिवूड' मध्ये 'अशी कोणती ऑफर आहे, जिला तू नकार दिलास? असा प्रश्न विचारण्यात आला.

Photo Credit; instagram

यावर अनिता म्हणाली, "मी कॅमेऱ्यावर Kissing सीन देण्यासाठी कम्फर्टेबल नाही. माझ्या नवऱ्याला हे आवडत नसावं, असं अनेकांना वाटत असेल. पण, माझा नवरा सुपर चील आहे."

Photo Credit; instagram

"आई झाल्यानंतर मला लव्ह मेकिंग सीनची ऑफर मिळाली होती. त्यावेळी Kissing सीन शूट करावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं."

Photo Credit; instagram

पुढे ती म्हणाली, "यावर माझ्या पतीने कम्फर्टेबल असशील तर करु शकतेस, असं सांगितलं. रोहितला याबद्दल काहीच अडचण नव्हती."

Photo Credit; instagram

"परंतु, जे मी कधीच केलं नाही, ते कॅमेऱ्यासमोर करण्यासाठी मी कम्फर्टेबल नाही. त्यामुळे मी आता हे स्विच करणार नाही."

Photo Credit; instagram

अनिता सध्या 'छोरियां चली गांव' शोमध्ये झळकत आहे.

पुढील वेब स्टोरी

अहान पांडे 'सैय्यारा गर्ल'च्या प्रेमात? पार्टीमध्ये दिसली भन्नाट केमिस्ट्री!

इथे क्लिक करा