Photo Credit; instagram

वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...

Photo Credit; instagram

अभिनेत्री वाहबिज दोराबजीने एकता कपूरच्या 'प्यार की एक कहानी' या शोमधून टेलिव्हिजनमध्ये डेब्यू केलं. या शोमुळे ती घराघरात पोहोचली पण त्यानंतर ती फारशा शोमध्ये दिसली नाही.

Photo Credit; instagram

या अभिनेत्रीने काही काळ टीव्ही इंडस्ट्रीपासून स्वतःला दूर ठेवले होते. याव्यतिरिक्त ती अनेक तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत राहिली. आता अभिनेत्रीने तिच्या वाईट आणि कठीण काळाबद्दल सांगितलं. मुलाखतीदरम्यान ती काय म्हणाली, पाहा.

Photo Credit; instagram

'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "एक वेळ अशी होती जेव्हा मी डिप्रेशनमध्ये जायचे. माझ्या पहिल्या शोनंतर, माझे वजन अचानक वाढले."

Photo Credit; instagram

"माझे वजन वाढल्यानंतर लोकांनी मला खूप टोमणे मारले.' काहींनी विचारलं, 'अरे, तुझं वजन कसं वाढलं.' तर काहींनी म्हटलं की 'आता तू साउथमध्ये जाऊन काम करायला हवं.'"

Photo Credit; instagram

"कुटुंबातील सदस्य असो किंवा मित्र, सगळे माझ्या वजनाबद्दल बोलायचे. त्यावेळी मला असं वाटलं की जणू काही ती माझीच चूक आहे. मी कदाचित काही गुन्हा केला असेल."

Photo Credit; instagram

"या सर्व गोष्टींचा माझ्यावर इतका परिणाम झाला की मी डिप्रेशनमध्ये गेले. मात्र आता या सर्व गोष्टींना मागे टाकून मी कमबॅक केलं आहे."

Photo Credit; instagram

यानंतर तिने तिच्याप्रमाणेच सदैव आनंदी राहण्याचा आणि जे लोक आपल्या मदतीस येतात, अशाच लोकांसोबत राहण्याचा सल्ला दिला आहे.

Photo Credit; instagram

यानंतर वाहबिजने असेही म्हणाले की, "माझी तब्येत ठीक नसते. म्हणूनच मला माझे आरोग्याकडे लक्ष देत काम करायला आवडते."

पुढील वेब स्टोरी

सकाळी Toilet ला जाण्याच्या आधी चालावं की नंतर.. कशामुळे होतो फायदा?

इथे क्लिक करा