Photo Credit; instagram

अभिनय, बिझनेसवुमन... 18व्या वर्षी अभिनेत्री बनली कोट्यवधींची मालकीण!

Photo Credit; instagram

अभिनेत्री आणि सोशल मीडिया इनफ्लुएन्सर अश्नूर कौर हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. 

Photo Credit; instagram

अश्नूर वयाच्या 5व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिने 2009 मध्ये 'झांसी की रानी' मध्ये बालकलाकार म्हणून टीव्हीमध्ये पदार्पण केले.

Photo Credit; instagram

यानंतर अश्नूर 'साथ निभाना साथिया', 'बडे अच्छे लगते हैं', 'सीआयडी' या टीव्ही शोमध्येही दिसली. 

Photo Credit; instagram

त्यानंतर 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमधील नायराच्या भूमिकेतून तिला चांगली ओळख मिळाली. 

Photo Credit; instagram

टीव्ही सीरियल्सशिवाय अश्नूरने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. अनुराग कश्यपच्या 'मनमर्जियां' आणि 'संजू'मध्येही ती दिसली आहे. 

Photo Credit; instagram

फार कमी लोकांना माहित असेल की, अभिनेत्री असण्यासोबतच अश्नूर एक बिझनेसवुमन देखील आहे. तिने वयाच्या 18व्या वर्षी जनरल झेड मेकअप ब्रँड 'कलरप्ले' लॉन्च केला. 

Photo Credit; instagram

अभिनय आणि मेकअप ब्रँड्ससोबत, अश्नूर सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते. 

Photo Credit; instagram

माहितीनुसार, अश्नूर लवकरच नवीन टीव्ही शो 'सुमन चली ससुराल'मध्ये दिसणार आहे. तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत

पुढील वेब स्टोरी

आनंदाचा होईल सत्यानाश! जर गच्चीवर ठेवत असाल 'या' 3 गोष्टी

इथे क्लिक करा