"46 वर्षांची झालीस तरी अविवाहित..." प्रश्नावर मुक्ता बर्वे स्पष्टच म्हणाली की, "वैयक्तिक..."
Photo Credit; instagram
मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने दमदार अभिनयाने सिनेसृष्टीत आपली छाप सोडली आहे.
Photo Credit; instagram
मुक्ताने मुख्य भूमिका साकारलेले बरेच चित्रपट गाजले असून चाहते सुद्धा तिच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसतात.
Photo Credit; instagram
नुकतंच, अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारलेला प्रश्न आणि त्यावर तिने दिलेलं उत्तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
मुलाखतीदरम्यान, मुक्ताला ती 46 वर्षांची झाली असून अजून अविवाहित असण्याबाबत प्रश्न विचारला होता.
Photo Credit; instagram
यावर मुक्ता उत्तर देत म्हणाली की, "माझं वैयक्तिक आयुष्य मी माझ्या कामापेक्षा कायमच लांब ठेवलं आहे. ते एकत्र करण्याची मला गरजही वाटत नाही."
Photo Credit; instagram
खरं तर, "मी या प्रश्नाचं उत्तरच देत नाही. मला कोणी समोर येऊन विचारतही नाही. मला वाटतं तशी गरजही नाही. कारण कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी का विचारावं आणि कोणी आपल्या खाजगी आयुष्याविषयी का उत्तर द्यावं."
Photo Credit; instagram
"जोपर्यंत त्याचा माझ्या जगण्या वागण्यावर परिणाम होत नाही तोवर तो माझा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आदरपूर्वक लोकांनीही जपला पाहिजे."
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तरुणांच्या काळजाचा ठोका चुकावणाऱ्या साई पल्लवीचे समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटोज...