"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
Photo Credit; instagram
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी आपल्या अनोख्या आणि पारंपारिक लूकमधील फोटोंनी चाहत्यांना भूरळ घालत असते.
Photo Credit; instagram
प्राजक्ता बऱ्याचदा तिच्या 'प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज' दागिन्यांच्या कलेक्शनच्या निमित्ताने फोटोशूट करत असते.
Photo Credit; instagram
नुकतंच तिने तिच्या म्हाळसा कलेक्शनमधील दागिने परिधान करून सुंदर फोटोशूट केलं आहे.
Photo Credit; instagram
तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली असून गळ्यात दागिने, हातात बांगड्या, नाकात मोठी नथ, सिल्व्हर कानातले आणि बाजूबंद घालून तिचा पारंपारिक लूक पूर्ण केला आहे.
Photo Credit; instagram
हे फोटोज शेअर करताना प्राजक्ताने "गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" तसेच "डोळ्यांना डसले पहाड इथले…" असं कॅप्शन दिलं आहे.
Photo Credit; instagram
प्राजक्ता माळीचे म्हाळसा लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.