जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा 'परम सुंदरी' हा चित्रपट सिनेमागृहात नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Photo Credit; instagram
सिद्धार्थ आणि जान्हवी बऱ्याच कार्यक्रमांत आणि वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावून चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. याच दरम्यान, ते दोघे मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहचले.
Photo Credit; instagram
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक अगदी लांबून येत असतात. यादरम्यान, जान्हवी तिच्या सह-कलाकार सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिथे पोहोचली.
Photo Credit; instagram
बाप्पाच्या दर्शनासाठी भरपूर लोक उपस्थित असल्यामुळे तुंबड गर्दी होती. त्यावेळी जान्हवी कपूर अस्वस्थ आणि घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहायला मिळालं.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले. काहींनी म्हटलं की गर्दीत गैरवर्तन होण्याची भीती असल्याने स्त्रियांना अस्वस्थ वाटतं.
Photo Credit; instagram
जान्हवी कपूरने बाप्पाच्या दर्शनासाठी लाल रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. यासोबतच तिने साजेसे झुमके आणि नाकात नथ घातली होती. तसेच, सिद्धार्थ मल्होत्राने गुलाबी रंगाचा कुर्ती परिधान केला होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!