Photo Credit; instagram

ज्योती मल्होत्राचे 'हे' सिक्रेट्स आले समोर! डायरीमध्ये नेमकं काय लिहिलंय?

Photo Credit; instagram

ज्योती तिच्यासोबत नेहमी एक डायरी ठेवायची. जेव्हा ती देशात किंवा परदेशात प्रवास करायची तेव्हा ती तिच्या मनातील विचार त्यात लिहून ठेवायची. तिच्या दहा पानांच्या डायरीत काही नोट्सही लिहिल्या असल्याचं समोर आलंय.

Photo Credit; instagram

ज्योतीने डायरीतील आठ पाने इंग्रजीत लिहिली आहेत. तसेच,  पाकिस्तानबद्दल तीन पाने हिंदीत लिहिली आहेत. एजन्सी आता ते डीकोट करत आहेत.

Photo Credit; instagram

ज्योतीने लिहिले की, "पाकिस्तानहून दहा दिवसांच्या प्रवासानंतर मी माझ्या देशात, भारतात परतलो आहे.  मला पाकिस्तानच्या लोकांकडून प्रेम आणि आपुलकी मिळाली."

Photo Credit; instagram

तसेच, तिच्या यूट्यूब अकाउंटचे सब्स्क्रायबर्स आणि मित्र देखील तिला  भेटायला गेल्याचं तिने डायरीत लिहिलं. मला लाहोरमध्ये फिरण्याची देखील संधी मिळाली पण त्यासाठी फक्त 2 दिवस मला कमी वाटले.

Photo Credit; instagram

ज्योतीने लिहिले आहे की "सीमेच्या मर्यादा किती काळ राहतील मला माहित नाही... पण माझ्या मनातील वेदना दूर झाल्या पाहिजेत. ही माझी प्रार्थना आहे."

Photo Credit; instagram

ज्योतीने पुढे असंही लिहिलं की, जर या प्रवासाशी संबंधित कोणत्याही क्षणाबद्दल काही प्रश्न असतील, जो व्हिडिओमध्ये शेअर करता आला नाही, तर तुम्ही विचारू शकता.

Photo Credit; instagram

ज्योतीने तिच्या इंडोनेशिया ट्रिपचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि लाखो रुपये खर्च झाल्याचेही सांगितले आहे. हे पैसे कुठून आले याचाही तपास केला जात आहे.

Photo Credit; instagram

तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीच्या कॉल डिटेल्समध्ये एक आंतरराष्ट्रीय नंबर आणि दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी संबंधित लोकांचे नंबर सापडले आहेत.

Photo Credit; instagram

क्लाउड स्टोरेजमधून मिळालेल्या व्हिडिओमध्ये बीएसएफच्या हालचाली, रडार स्थाने आणि उच्च-सुरक्षा क्षेत्रांबद्दल माहिती असल्याचे तपास संस्थांना आढळून आले आहे.

Photo Credit; instagram

ज्योती मल्होत्राने पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या अत्यंत संवेदनशील सीमाभागांचे व्हिडिओ बनवले आहेत आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

पुढील वेब स्टोरी

'या' मुलांकाच्या मुलींचा नवरा असतो खूपच नशीबवान!

इथे क्लिक करा