हिंदी बोलण्यास काजोलचा नकार! म्हणाली, "ज्यांना समजायचंय ते..." वक्तव्याने खळबळ
Photo Credit; instagram
बॉलीवूड अभिनेत्री काजोल आता कॉन्ट्रोव्हर्सीची शिकार झाल्याचं पाहायला मिळतंय. तिने एका कार्यक्रमात हिंदी बोलण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे.
Photo Credit; instagram
तिच्या या वक्तव्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यापर्यंत बोललं जात आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये अगदी रागात तिने हिंदी बोलण्यास नकार दिल्याचं दिसत आहे.
Photo Credit; instagram
मुंबईत झालेल्या एका इव्हेंटमध्ये काजोल मराठीत उत्तरं देत होती. त्यावेळी एका पत्रकारने तिला हिंदीमध्ये बोलण्यासाठी सांगितल्यानंतर तिला खूप रागस आला.
Photo Credit; instagram
त्यावेळी काजोल रागात म्हणाली, "आता मी हिंदीमध्ये बोलू? ज्यांना समजायचं आहे, ते समजून घेतील." त्यानंतर मराठीत चित्रपट करण्याबाबतीत विचारलं असता काजोलने 'नक्की करीन" असं उत्तर दिलं.
Photo Credit; instagram
काजोलच्या या प्रतिक्रियेवर चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. यामुळे ती यूजर्सकडून ट्रोल होत असल्याचं पाहायला मिळतंय. काहीजण तर तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
Photo Credit; instagram
यूजर्सनी काजोलला चुकीचं ठरवत म्हणाले, "आम्ही सुद्धा भारतीय आहोत आणि तुझे चित्रपट बघणं बंद करू." तसेच, दुसऱ्याने लिहिले की "मराठीतच चित्रपट कर."
Photo Credit; instagram
काजोलच्या या वक्तव्यामुळे भाषेबद्दल नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'पप्पी दे पारूला..', स्मिताने नवे बिकिनी फोटो केले शेअर तुम्ही पाहिले का?