"मन धावतंया तुझ्याच मागं..." हिंदी रिअॅलिटी शो गाजवणारी कोकणकन्या राधिका भिडे आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
सध्या सोशल मीडियावर "मन धावतंया तुझ्याच मागं..." हे गाणं तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
मराठमोळी गायिका आणि कोकणकन्या म्हणून ओळखली जाणारी राधिका भिडे हिने 'आय पॉपस्टार' या हिंदी रिअॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये हे गाणं गायलं होतं. या गाण्याला मराठी तसेच हिंदी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
राधिका भिडे ही मुंबईतील एक लोकप्रिय संगीतकार, गायिका, गीतकार, पियानिस्ट, कीबोर्डिस्ट, संगीत दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहे.
Photo Credit; instagram
राधिका ही मूळची रत्नागिरीची असून ती सध्या मुंबईत राहते.
Photo Credit; instagram
राधिकाने के. एम. म्युझिक कन्सर्व्हेटरी, रॉक स्कूल लंडन आणि इनर व्हॉइस स्टुडिओज येथे शिक्षण घेतलं. तिच्याकडे संगीत क्षेत्रात सहा वर्षांचा अनुभव आहे.
Photo Credit; instagram
राधिका ही योजक उद्योजकांची दुसरी कन्या आहे. तिची मोठी बहीण शमिका भीडे ही सुद्धा प्रसिद्ध गायिका आहे. शमिका भिडे 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमुळे नावारुपाला आली होती.
Photo Credit; instagram
'मन धावतया...' गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राधिकाचे फॉलोअर्स 230K हून अधिक झाले आहेत.
Photo Credit; instagram
आय पॉपस्टार शो मधील राधिकाच्या गाण्यांना नेटकरी तसेच प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत असून केवळ मराठीच नव्हे तर हिंदी संगीतप्रेमींकडून राधिकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ब्लॅक अॅण्ड गोल्ड'... मराठी अभिनेत्री ईशा केसकरचा हॉट लूक चर्चेत!