Photo Credit; instagram

'लक्षात ठेवण्यासारखं काय त्यात?' मंदिरा बेदी का करत नाही पतीचं वर्षश्राद्ध?

Photo Credit; instagram

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं 2021 साली दुर्दैवी निधन झालं. या घटनेला आता 4 वर्षे लोटली.

Photo Credit; instagram

मंदिरा म्हणाली की तिच्या पतीच्या मृत्यूनंतर पहिल्या वर्षातील खास प्रसंग आणि सण तिच्यासाठी खूप कठीण गेले. तिने तिच्या पतीची पुण्यतिथी साजरी करायला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

मंदिराच्या म्हणण्यानुसार, यात लक्षात ठेवण्यासारखे काहीही नाही. तिने असे का म्हटले आणि तिला तिच्या पतीचा मृत्यू का आठवायचा नव्हता, याबद्दल तिने सांगितले.

Photo Credit; instagram

मंदिराने 'द फुल सर्किल'शी बोलताना सांगितले की, तिचा पती राज यांच्या निधनानंतर एक वर्ष तिने सर्व विधी केले, परंतु एका वर्षानंतर तिने नवऱ्याची पुण्यतिथी साजरी न करण्याचे ठरवले.

Photo Credit; instagram

ती म्हणाली, मी एक वर्षभर पुण्यतिथीचे सर्व विधी आणि पूजा केली. मात्र, त्या वर्षीभरानंतर ही पूजा आणि विधी न करण्याचा तिने निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

"आपण हा दिवस का लक्षात ठेवायचा?, त्यात लक्षात ठेवण्यासारखे काय आहे? हा तर आमच्या आयुष्यातील एक दुःखद दिवस आहे." असं तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

मंदिराने पुढे सांगितलं, "आता मला हे सांगताना काहीच वेदना जाणवत नाही. निराश न होता हे सर्व काही मी तुम्हाला सांगू शकते. मात्र, राजच्या निधनानंतर पहिलं वर्ष, पहिला विधी आणि पहिला सण खूप वेदनादायी होता."

Photo Credit; instagram

"त्याच्या निधनानंतर पहिला लग्नाचा वाढदिवस, पहिला वाढदिवस, पहिली दिवाळी, पहिले नवीन वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण गेले."

Photo Credit; instagram

जेव्हा पहिल्यांदा अशी कोणती वाईट गोष्ट घडते, तेव्हा आपण आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून मोकळेपणाने रडतो आणि असं रडल्यानंतर अश्रूही आपल्याकडे शिल्लक नसतात.

पुढील वेब स्टोरी

कोणता हापूस आंबा खरा आणि कोणता खोटा? सोप्या Tips ने झटपट ओळखा!

इथे क्लिक करा