Photo Credit; instagram

कोणता हापूस आंबा खरा आणि कोणता खोटा? सोप्या Tips ने झटपट ओळखा!

Photo Credit; instagram

उन्हाळा सुरू होताच सर्वचजण बाजारात आंबे येण्यासाठी वाट पाहत असतात.

Photo Credit; instagram

फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या रसाळ आंब्याचा गोडवा सगळ्यांनाच आवडतो. सध्या, बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विकण्यासाठी उपलब्ध असतात.

Photo Credit; instagram

यामधील हापूस प्रजातीचे आंबे सगळ्यांच्याच आवडीचे असतात. हापूस आंब्याचा गोडवा काही औरच असतो. मात्र, बाजारात बनावट हापूस आंबे विकण्यासाठी उपलब्ध असतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे खरे आणि बनावट आंबे ओळखणे अवघड होऊन बसते. त्यामुळे आंबे खरेदी करताना खऱ्या आणि बनावट आंब्यांमधील फरक ओळखणं खूप गरजेचं आहे.

Photo Credit; instagram

खरे हापूस आंबे ओळखण्यासाठी 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा.

Photo Credit; instagram

सुगंध: हापूस आंब्यामधून सेंद्रिय/नैसर्गिक सुगंध येतो. असा सुगंध येत नसलेले आंबे बहुतेकदा बनावट किंवा कृत्रिमरित्या पिकवलेले असतात.

Photo Credit; instagram

रंग: आंब्याचं साल चमकदार सोनेरी/पिवळी असावी. लालसर-गुलाबी किंवा खूप चमकदार आंबे टाळावेत कारण ते कृत्रिमरित्या रंगवलेले असू शकतात.

Photo Credit; instagram

आकार: खऱ्या हापूस आंब्याचे टोक थोडे टोकदार असते आणि त्याचा आकार अंडाकृती असतो. हापूस आंब्याला स्पर्श केल्यास तो गुळगुळीत भासतो.

Photo Credit; instagram

चव: खऱ्या हापूस आंब्याची चव खूपच गोड आणि थोडीशी आंबट असते. जर आंब्याची चव खूप आंबट किंवा फीकी असेल तर ते बनावट पद्धतीने  बनवलेले असू शकतात.

पुढील वेब स्टोरी

तरूण आणि हेल्दी राहायचं असेल, तर 3 सवयी ठरतील फायद्याच्या

इथे क्लिक करा