17 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची पहिल्या वेब सीरीज 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'चं प्रिमिअर झालं.
Photo Credit; instagram
अंबानी कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा या इव्हेंटला उपस्थिती दर्शवली. यामध्ये नीता अंबानीचा लूक अधिक आकर्षक वाटत होता.
Photo Credit; instagram
नीता अंबानीने या समारंभात ग्रीन म्हणजेच हलक्या हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. ही साडी सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केली होती.
Photo Credit; instagram
ही साडी प्लेन असून बॉर्डरवर सिल्व्हर स्टोन्स लावण्यात आले होते. साडीच्या बॉर्डरमुळे पूर्ण लूकला सुंदर टच मिळाला. तसेच, नीताने यावर लेस ब्लाउझ परिधान केलं होतं.
Photo Credit; instagram
या साडीवरील ब्लाउझवर स्वारोवस्की क्रिस्टल पाहायला मिळालं. यामुळे नीताचा हा लूक रॉयल वाटत होता.
Photo Credit; instagram
या आउटफिटवर नीताने अनोखा नेकलेस कॅरी केला होता. नीताने पाराइबा जेम्सपासून बनलेला डबल लेअर नेकलेस घातला होता.
Photo Credit; instagram
या नेकलेसवर फिरोझा टायटेनियमची नक्षी पाहायला मिळाली. यामुळे नीताचा लूक आणखी लक्षवेधक ठरला.
Photo Credit; instagram
यासोबतच नीताने हार्ट शेप्ड स्टड इअररिंग्स, हातात डायमंडचे कडे आणि अंगठी घातली होती. तसेच, तिने साइड पार्टिशन करून केस मोकळे सोडले होते.