आपल्या काही विचित्र गोष्टींमुळे राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने रावणाचा अवतार घेतला होता. दसऱ्याच्या निमित्ताने राखी आगळावेगळ्या रुपात पाहायला मिळाली.
राखीने काळ्या आणि सोनेरी रंगाचा पोशाख परिधान केल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी तिने काळा गॉगल आणि रावणासारख्या मिशाही काढल्या होत्या.
राखीने आपल्या डोक्यावर रावणाचे 9 मुकुट परिधान केले होते. त्यामुळे ती वेगळ्याच रुपात दिसली. तिच्या हातात यावेळी गदा आणि धनुष्यबाणही होता.
राखीचा हा अवतार पाहून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले आहे.
राखी सावंतच्या व्हायरल व्हिडिओवर एका यूजरने म्हटले आहे की, तुझा अवतार पाहून रावणही पळून जाईल अशी कमेंट दिली आहे.
सोशल मीडियावर तिला ट्रोल करताना तिला तू कलियुगातील राक्षस असल्याचेही म्हटले आहे. अशा अनेक कमेंट तिला दिल्या आहेत.
राखी सावंतच्या या हटके स्टाईलमुळेच ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. अशा चित्रविचित्र गोष्टीमुळेही तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.