रणबीर कपूर सध्या 'एनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात तो भगवान रामाची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच त्याने धूम्रपानही सोडले आहे.
रणबीरने या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, या चित्रपटाची तयारी सुरु असून अजून काही गोष्टी फायनल होणं बाकी आहे.
रामायण हा मोठा प्रोजेक्ट असून त्यावर खूप काम करायची गरज आहे. मात्र अजून त्याबद्दल काही गोष्टी ठरायच्या आहेत. मात्र काही दिवसात त्या गोष्टीही पूर्ण होतील.
रामायणाबद्दल काही अजून बऱ्याच गोष्टी लॉक होणे बाकी आहे. मात्र रामायणाबद्दल त्याच्या आयुष्यात काय फरक पडला हे मात्र त्याने सांगितले.
या प्रोजेक्टमुळे त्याच्या आयुष्यात बदल झाले आहेतच मात्र त्याने आता त्याने धुम्रपानही सोडले आहे. त्यामुळे लाईफस्टाईलमध्ये बदल झाल्याचेही त्याने सांगितले.
चित्रपटाची गरज म्हणून मी सगळे केस काढून टक्कल केले होते. मात्र आता पुन्हा एकदा मी माझे केस वाढवत आहे.
सध्या कोणत्याही चित्रपटाचे काम नाही माझ्याकडे. मात्र काही गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात कमालीचा फरक पडला आहे. चॉकलेट भरपूर खातो तर धुम्रपान करणं सोडून दिलं आहे.
रणबीर कपूर लवकरच 'एनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांच्या भूमिकेत आहेत.