वर्ल्डकप जिंकल्यानंतर स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडचं खास गिफ्ट! काढला 'हा' टॅटू...
Photo Credit; instagram
भारताच्या क्रिकेट महिला संघाने 2 नोव्हेंबर रोजी यंदाच्या वर्ल्डकप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. दरम्यान, संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाचा प्रियकर पलाश मुच्छलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
खरं तर, सुप्रसिद्ध गायक पलाश मुच्छल आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Photo Credit; instagram
विश्वचषक सामना जिंकल्यानंतर स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच पलाशला सुद्धा खूप आनंद झाला.
Photo Credit; instagram
पलाशने आपल्या आनंद विशिष्ट पद्धतीने व्यक्त करण्यासाठी त्याने आपल्या प्रेयसीच्या नावाने अनोखा टॅटू काढल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
या टॅटूवर स्मृतीच्या नावाचे इनिशियल्स म्हणजेच SM आणि तिच्या जर्सीचा नंबर 18 असल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर पलाशने शेअर केलेल्या या फोटोंना नेटकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पंसती मिळत असून त्यावर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत.
Photo Credit; instagram
स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत असून आता नोव्हेंबर महिन्यात सांगली येथे दोघांच्या लग्नाचा बार उडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.