Arrow

उर्फी जावेदची प्रकृती बिघडली! रुग्णालयातील फोटो व्हायरल

Arrow

उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून गायब आहे. नवीन वर्षाच्या दिवशीही ती कोणत्याही नव्या लूकमध्ये दिसली नाही. मात्र उर्फीने आता तिचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना धक्काच दिला आहे. 

Arrow

असं कधीच झालं नाही की ती एखाद्या खास दिवशी नव्या लूकमध्ये दिसली नाही किंवा ती एखाद्या सणाला सोशल मीडियावर आलीच नाही. मात्र यावर्षीच्या नव वर्षाला मात्र तिने अनेकांना विचार करायला लावले.

Arrow

मात्र चाहत्यांच्या मनातील प्रश्नांना तिनेच इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करत उत्तर दिले आहे. ती सध्या हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे. तर तिच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्कही लावण्यात आला आहे. 

Arrow

फोटो शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, '2024 ची सुरुवात धमाकेदार झाली आहे.' मात्र, फोटो पोस्ट केल्यानंतर मात्र ते डिलीट केले होते.

Arrow

उर्फीने तिला नेमकं काय झालं ते सांगितले नाही.

Arrow

मात्र सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तिला यापूर्वी टॉन्सिल्स आणि लॅरिन्जायटीसचा त्रास झाला होता.थंडी आणि प्रदूषणामुळे तिला ती समस्या आली होती. मात्र ती यातून ती लवकरच बाहेर येईल. 

Arrow

आज तकने उर्फी जावेद यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने काहीही सांगण्यास नकार दिला. 

रात्री कांदा कधीच खाऊ नका, कारण आहे भयंकर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा