Photo Credit; instagram

22 व्या वर्षी मोडलं लग्न... पतीच्या निधनाच्या 8 दिवसानंतर काय म्हणाली 'अंगूरी भाभी'?

Photo Credit; instagram

'भाभीजी घर पर हैं' मालिकेतील 'अंगुरी भाभी' ही भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या बऱ्याच अडचणींमधून जात आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीचे आधीचे पती पियुष पुरे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे शुभांगी खूप दुःखी आहे. शुभांगीच्या पतीचे लिव्हर सिरोसिस आजारामुळे निधन झाले.

Photo Credit; instagram

शुभांगीने 2003 मध्ये पियुष पुरेशी लग्न केले होते आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

शुभांगीच्या पतीचे 18 एप्रिल रोजी निधन झाले आणि त्यानंतर शुभांगीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. प्रसिद्धी मिळाल्यामुळे शुभांगीने तिच्या पतीला सोडल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे.

Photo Credit; instagram

ट्रोलिंगनंतर आता अभिनेत्रीने तिच्या माजी पतीसोबत घटस्फोट झाल्यामागचं कारण सांगितलं आहे. तसेच, त्या दोघांच्या ब्रेकअपचं सत्य देखील तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

TOI शी बोलताना शुभांगी म्हणाली, "पूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय एखाद्याला जज करणं खूप सोपं आहे. लोकांना वाटतं की यश मिळाल्यानंतर मी माझ्या पतीला सोडलं, पण असं नाहीये."

Photo Credit; instagram

"मी यशस्वी झाल्यामुळे माझ्या पतीला सोडलं नाही, तर त्याच्या दारूच्या व्यसनामुळे आमचे जीवन कठीण झाले होते, म्हणून सोडलं."

Photo Credit; instagram

मी माझे लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण गोष्टी सहन करण्यापलिकडे. गेल्या होत्या. आमच्या दोन्ही कुटुंबांनीही त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या व्यसनाने त्याला उद्ध्वस्त केले.

Photo Credit; instagram

घटस्फोटानंतर सुद्धा ती तिच्या पतीशी बोलत असल्याचं अभिनेत्रीने सांगितले. शुभांगीने असेही सांगितले की तिचे तिच्या पतीच्या कुटुंबाशीही चांगले संबंध आहेत.

Photo Credit; instagram

अभिनेत्री म्हणाली की दारूचे व्यसन केवळ एका व्यक्तीला उद्ध्वस्त करत नाही तर त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करते. विशेषतः मुलांवर याचा वाईट परिणाम होतो.

पुढील वेब स्टोरी

अक्षय्य तृतीया आली जवळ, सोनं खरेदीचा 'हा' आहे सगळ्यात सॉलिड मुहूर्त!

इथे क्लिक करा