राज ठाकरेंबाबतचा 'तो' सवाल, पाहा सोनाली बेंद्रेने काय दिलं उत्तर!
Photo Credit; instagram
एकेकाळी बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची नावं एकमेकांशी जोडली जात होती. 20 वर्षांपूर्वी त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. आता, याबद्दल सोनालीने सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
नुकतंच, एका मुलाखतीत सोनाली बेंद्रे हिला विचारण्यात आलं की, त्यांचं नाव बऱ्याचदा राज ठाकरेंसोबत जोडलं गेलं. याबाबत बोलताना सोनाली म्हणाली की, तिचे ठाकरे कुटुंबीयांशी जुने संबंध आहेत.
Photo Credit; instagram
मुलाखतीदरम्यान, सोनालीने सांगितले की तिचा मेहुणा एक क्रिकेटपटू होता, जो राज ठाकरेंच्या चुलत भावासोबत खेळायचा.
Photo Credit; instagram
तिने असंही सांगितलं की तिच्या बहिणीची सासू तिच्या कॉलेजमध्ये साहित्य विभागाची प्रमुख होती. ती राज यांना त्यांच्या वडिलांमुळे ओळखते. राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या आई आणि माझी मावशी या जिवलग मैत्रिणी होत्या.
Photo Credit; instagram
आता यावर अनेक यूजर्संनी अभिनेत्रीबद्दल पोस्टही केल्या आहेत. एका यूजर्स लिहिले की, 'या दोन नातेवाईकांमधील संबंध समजून घेण्यापेक्षा CAT पेपर देखील सोपे आहे.'
Photo Credit; instagram
दुसऱ्याने लिहिले की, 'सोनाली बेंद्रेचा हा व्हिडिओ मला एसएससी LDC स्टाईलच्या लिपिक परीक्षेची आठवण करून देतो ज्यामध्ये नातेसंबंधांबद्दल प्रश्न विचारले जातात जसे की जर ही व्यक्ती त्याच्या भावाच्या काकाच्या काकूची आजी असेल तर तिचे काय?'
Photo Credit; instagram
राज ठाकरेंसोबत सोनालीचं जे नाव जोडलं जातं त्यावर तिने नाराजी व्यक्त करताना म्हटलं की, 'लोकांच्या अशाप्रकारच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
35+ महिलांनी नौकासन केलं की कामच झालं, सगळा विषयच क्लिअर!