35+ महिलांनी नौकासन केलं की कामच झालं, सगळा विषयच क्लिअर!
Photo Credit; instagram
वयाच्या 30 वर्षानंतर महिलांच्या शरीरात बरेच होर्मोनल आणि शारीरिक बदल होत असतात. या वयात काही सोप्या आणि प्रभावी योगासनं केल्यानं आरोग्य चांगलं ठेवता येतं.
Photo Credit; instagram
विशेषत: महिलांसाठी नौकासन फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. या आसनात शरीर बोटीच्या आकारासारखे दिसते. हे पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
Photo Credit; instagram
दररोज नौकासन केल्यानं पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास आणि टोन्ड लूक मिळण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
हे आसन केल्याने पोटाचे भाग सक्रिय होतात, ज्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते. नियमित हे आसन केल्यानं गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवता येतो.
Photo Credit; instagram
मेनोपॉजच्या काळात होर्मोनल असंतुलनाच्या समस्या उद्भवतात. नौकासन केल्याने शरीरात होर्मोनल बॅलेन्स राहतो आणि मूड स्विंग्स कमी होतात.
Photo Credit; instagram
नौकासन केल्याने पाठीचा कणा आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. यामुळे वाढत्या वयात पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळवता येतो.
Photo Credit; instagram
हे आसन एकाग्रता आणि संतुलन राखण्यासाठी फायदेशीर असतं. नियमित हे आसन केल्यानं तणाव, चिंता आणि मानसिक थकवा कमी करता येतो.
Photo Credit; instagram
नौकासन केल्याने पोट आणि प्रजननच्या भागांचा चांगला मसाज होतो. यामुळे नियमित मासिक पाळी होण्यास मदत होते आणि वेदनासुद्धा कमी करता येऊ शकतात.
Photo Credit; instagram
हा योगा केल्यामुळे शरीरातील संतुलन आणि लवचिकता वाढते. वाढत्या वयातसुद्धा शरीर सक्रिय आणि संतुलित राहते. यासोबत वजन कमी करण्यास देखील मदत मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
म्हातारपण येणारच नाही, एक फळ ठेवेल तुमची स्कीन टाईट