कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
Photo Credit; instagram
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता साजिद खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलिकडेच एका अभिनेत्रीने त्याच्यावर कास्टिंग काउचचा आरोप केलाय.
Photo Credit; instagram
साजिद खानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढवणारी मराठी अभिनेत्री नवीना बोले आहे. जी टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे.
Photo Credit; instagram
नवीनाने तिच्या कारकिर्दीत 35 हून अधिक शोमध्ये काम केले आहे. 'मिले जब हम तुम' या मालिकेतील दिया भूषणच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
Photo Credit; instagram
तिने 1998 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेली. तिने 'सीआयडी', 'एसएसएस..ये कोई है', 'साजन रे झूट मत बोलो', 'तारक मेहता का उल्टा चष्मा' यासह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Photo Credit; instagram
ती जगजीत सिंग, गुलाम अली, आबिदा परवीन, अमान आणि अयान अली बंगश यांच्या म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.
Photo Credit; instagram
ती अभिनेत्री असण्यासोबतच भरतनाट्यम नर्तिका देखील आहे. नवीनाने वेब सिरीजमध्येही काम केले आहे.
Photo Credit; instagram
नवीनाने 2017 मध्ये अभिनेता-निर्माता करण जीतशी लग्न केलेले, 7 वर्षांनी 2024 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
Photo Credit; instagram
'हे बेबी' चित्रपटादरम्यान साजिद खानने तिच्यासोबत कास्टिंग काउच केल्याचा आरोप नवीनाने केला आहे. साजिद खानने मला घरी बोलावले आणि कपडे काढण्यास सांगितलेले. असा तिने आरोप केला आहे.