Photo Credit INSTAGRAM

Arrow

Rani Mukherji : यश चोप्रा नव्हते खूश, हट्टापायी आईने राणी मुखर्जीला स्वीकारलं

Arrow

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक, आदित्य चोप्रा आणि पत्नी राणी मुखर्जी आज त्यांच्या लग्नाचा 9 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Arrow

आजचा दिवस आदित्य चोप्रा आणि राणीसाठी खूप खास आहे.

Arrow

दोघांनी 2014 साली लग्न केले. त्यापूर्वी ते रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र त्यांच्या लव्हस्टोराला वडील यश चोप्रा यांचा विरोध होता.

Arrow

आदित्य आणि राणी यांची पहिली भेट करण जोहरमुळे 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटादरम्यान झाली होती.

Arrow

आदित्यला राणीचे काम आवडायचे आणि त्यानेच राणीचे नाव करणला त्याच्या चित्रपटासाठी सुचवले.

Arrow

या भेटीची खास गोष्ट म्हणजे राणी आदित्य चोप्राला अजिबात ओळखत नव्हती. आदित्यला हे जाणून धक्क बसला होता. तोपर्यंत तो नावाजलेला दिग्दर्शक बनला होता.

Arrow

2001 मध्ये आदित्य चोप्राने त्याची तत्कालीन प्रेयसी पायल खन्नासोबत लग्न केले होते. दोघेही शाळेपासून एकत्र होते.

Arrow

त्यावेळी यशराज आणि पामेला, पायल त्यांची सून झाल्याने खूप खुश होते.

Arrow

पायल इंटिरियर डिझायनर होती आणि तिने यशराज स्टुडिओ अंतर्गत तिचे कौशल्य दाखवण्यास सुरूवात केली. नंतर त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही.

Arrow

2009 मध्ये पायल आणि आदित्यने घटस्फोट घेतला. नंतर राणी आणि आदित्यच्या रिलेशनशिपच्या बातम्या येऊ लागल्या.

Arrow

असेही म्हटले जाते की, आदित्यच्या आई-वडिलांनाही हे नाते मान्य नव्हते. यश चोप्रांनीही मुलाला घराबाहेर काढले होते.

Arrow

पामेला आणि यश यांना अभिनेत्री म्हणून राणी आवडली, पण त्यांची पहिली सून पायलची जागा घेणे त्यांना मान्य नव्हते. आई-वडिलांच्या नापसंतीमुळे आदित्यने घर सोडले होते.

Arrow

आदित्य जवळजवळ एक वर्ष हॉटेलमध्ये राहिला, त्यानंतर त्याच्या हट्टापोटी आई पामेलाने राणीला स्वीकारले.

Arrow

राणी आणि आदित्य चोप्राने अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 21 एप्रिल 2014 रोजी गुपचूप लग्न केले आणि डिसेंबर 2015 मध्ये त्यांना मुलगी झाली. 

उफ्फ...! चारू असोपाचे हे फोटो पाहुन तुमची अशीच असेल रिअॅक्शन

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा