Arrow

दिवाळीसाठी खास सोनेरी भेट! 24 कॅरेट सोन्याची मिठाई, किंमत किती?

Arrow

दिवाळीनिमित्त मिठाईच्या दुकानांपासून ते घरोघरी विविध प्रकारच्या स्वादिष्ट आणि अनोख्या मिठाई तयार केल्या जातात.

Arrow

या दिवाळीत अहमदाबादच्या ग्वालिया येथील एका दुकानदाराने अत्यंत महागडी मिठाई तयार केली आहे.

Arrow

ही मिठाई अनमोल असले तरी ही 24 कॅरेट सोन्याच्या लेयरने बनवण्यात आली आहे. स्वर्ण मुद्रा असे या मिठाईचे नाव आहे.

Arrow

स्वर्ण मुद्रा नावाच्या मिठाईची किंमत प्रतिकिलो 21000 रुपये करण्यात आली आहे. ही मिठाई लोकांना आश्चर्यचकित करणारी अशी आहे.

Arrow

या दिवाळीत सोन्याचे नाणे खरेदी करण्यापूर्वी आधी त्याची चव चाखायची असेल तर त्या सोन्यासारख्या मिठाईची किंमतही मोजावी लागणार आहे.

Arrow

स्वर्ण मुद्रा नावाची ही मिठाई, जी बिस्किटसारखी दिसते. मात्र तुम्ही जर 1 किलो विकत घेतली तर तुम्हाला त्यामध्ये 15 वेगवेगळ्या प्रकारची मिठाई भेटणार आहे. त्यामुळे त्यातील एका पदार्थाची किंमत असणार आहे 1400 रुपये.

Arrow

मिठाईबद्दल माहिती देताना रविना तिलवाणी यांनी सांगितले की, यावर्षी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे स्वर्ण मुद्रा मिठाई यंदा अगदी खास बनवण्यात आली आहे.

Arrow

ऑर्डर मिळाल्यानंतर, आम्ही आवश्यकतेनुसार ती बनवणार आहोत. 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेली, सोन्याचे नाणे, बदाम ब्लूबेरी आणि पिस्ता क्रॅनबेरीसह विविध घटकांचा यामध्ये समावेश आहे.

Arrow

रवीना यांनी सांगितले की, यावर्षीही या मिठाईला मोठी मागणी आहे. 

Arrow

लोकांच्या मागणीनुसार आम्ही 350 रुपयांपासून 15,000 रुपयांपर्यंतची गिफ्ट पॅकेट्स बनवली आहेत. लोक त्यांच्या गरजेनुसार खरेदी करू शकणार आहेत.

रश्मिकानंतर कतरिनाचे Deepfake फोटो व्हायरल, 'टॉवेल सीन'सोबत छेडछाड

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा