Arrow

रम आणि ब्रँडीमध्ये 'हा' आहे फरक

Arrow

हिवाळ्याच्या दिवसात ब्रँडी आणि रमची मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसून येते. त्यामुळे शरीराला एक प्रकारची उर्जाही मिळत असते. 

Arrow

रम आणि ब्रँडीची हिवाळ्यात मागणी वाढत असली तर दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे तेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

Arrow

ब्रँडी आणि रम या दोन्हीमध्ये सर्वात महत्वाचा फरक निर्मिती म्हणजेच बनवण्याची पद्धतीत फरक आहे.  रम ऊस किंवा गुळापासून तयार केली जाते. 

Arrow

ब्रँडीला ब्रँडीवाइन असंही म्हणतात, कारण कारण ते आंबलेल्या द्राक्षांपासून बनवले जाते. द्राक्षांपासून ती बनवली जात असली तरी कधी कधी त्यामध्ये इतर फळांचाही त्यामध्ये समावेश असू शकतो.

Arrow

बनवण्याच्या पद्धतीबरोबरच दुसरा महत्वाचा त्यामध्ये फरक आहे तो म्हणजे त्यामध्ये असलेले अल्कोहोलचे प्रमाण. कारण ब्रँडीमध्ये रमपेक्षा कमी अल्कोहोल असते.

Arrow

रममध्ये 37.5 टक्के ते 80 टक्के तर ब्रँडीमध्ये 35 ते 60 टक्के अल्कोहोल असते. ब्रँडीचे उत्पादन प्रथम ग्रीस आणि रोममध्ये झाले. तर, रमचा उगम कॅरिबियन प्रदेशात झाला.

Arrow

ही माहिती फूड आणि वाईन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दिला आहे, या माहितीचा उद्देश्य मद्यपानाला प्रोत्साहन देण्याचा अजिबात नाही.

‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा