Arrow

वाइन म्हणजे नक्की काय? आणि त्याचे प्रकार किती...? 

Arrow

वाइन हा एक प्रकारचा अल्कोहोल असले तरी ते द्राक्षे आंबवूनच तयार केले जाते. ते पिण्याऱ्यांची  संख्याही अधिक आहे. कारण वाइनचा एक घोट घेतला तरी अनेक जण वाइनच्या प्रेमात पडत असतात.

Arrow

जर तुम्हाला वाइन पिण्याची आवड असेल, तर तुम्ही स्पार्कलिंग, व्हाईट, रेड, रोझ, मेरलोट, चार्डोने या वाइनची नावं ऐकली असतीलच. आणि त्यापैकी एक तुमची आवडतीही असेल.

Arrow

जर तुम्हाला वाइनची चव घ्यायची असेल तर त्याआधी ती कशी बनवली जाते, त्याचे प्रकार किती आहेत, हे जाणून घेणंही महत्वाचे आहे.

Arrow

रेड वाईन हे गडद रंगाचे जे द्राक्षे असतात त्यापासून बनवली जाते. त्यामुळे त्याचा रंग गडद लाल दिसतो.

Arrow

शिराझ, मेरलोट, कॅबरनेट सॉव्हिग्नॉन, पिनोट नॉयर आणि झिनफँडेलसारख्या रेड वाईनमध्येही अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

Arrow

पांढरा बनवण्याची प्रक्रिया रेड वाईनसारखीच आहे, फरक एवढाच आहे की ती हिरव्या द्राक्षांपासून बनविली जाते.

Arrow

त्यामुळे त्याचा रंग हलका आहे. Chardonnay, Sauvignon Blanc आणि Riesling इत्यादी अनेक जाती आहेत.

Arrow

स्पार्कलिंग वाइन ही छानच दिसत असते कारण त्यामध्ये दिसणारे बुडबुडे लोकांना साहजिकच आकर्षित करत असतात.

Arrow

ते बनवण्याची प्रक्रिया पांढऱ्या वाइनसारखीच आहे, परंतु त्यात Co2 जोडले जाते त्यामुळे ती अधिक सुंदर भासत असते.

Arrow

रोझ वाईन हा रेड वाईनचा एक प्रकार आहे पण तो द्राक्षाच्या सालीपासून  तयार केली जाते.

Arrow

त्यामुळे त्याचा रंग थोडा लाल रंगापेक्षा थोडा हलका असतो. द्राक्षाच्या सालीपासून वाइन बनवण्याची ही पद्धत खूप जुनी आहे.

Arrow

आहार आणि वाइन तज्ज्ञांच्या मते ही माहिती देण्यात आली आहे. मात्र ही माहिती मद्यपानाला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आली नाही. 

पहाटे लवकर उठण्यासाठी अलार्म लावत असाल तर आधी ‘हे’ वाचा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा