Photo Credit; instagram

120 किलो ते 71 किलो... मुस्कानला असं वेट ट्रॉन्फॉर्मेशन जमलं तरी कसं? डाएट प्लॅनविषयी जाणून घ्या

Photo Credit; instagram

सध्याच्या जीवनशैलीमध्ये वजन कमी करणं हे कोणत्या आव्हानापेक्षा कमी नाही. धावपळीच्या जगात व्यायामासाठी आणि डाएटकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

Photo Credit; instagram

इंस्टाग्रामवर मुस्कान नावाच्या २५ वर्षीय मुलीने तिचा वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला. तिचा हा प्रवास पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले.

Photo Credit; instagram

मुस्कानने सांगितले, पूर्वी तिचे वजन 120 किलो होते आणि 48 किलो वजन कमी केल्यानंतर आता तिचे वजन 71 किलो झाले आहे. यासाठी त्याने आपल्या आहाराची काळजी घेतली आणि चांगला व्यायाम केला.

Photo Credit; instagram

तिने इंस्टा पोस्टवर लिहिले की, "तुमच्या आवडत्या गोष्टीचा त्याग करणे सोपे नाही पण तुम्हाला ते करावेच लागेल. तुमची आवडती गोष्ट हाच कधीतरी तुमचा शत्रू ठरु शकतो."

Photo Credit; instagram

मुस्कानने तिची दिनचर्या सांगतना म्हटले, सकाळी (7 ते 8 वाजता) मेटाबॉलिजम वाढविण्यासाठी कोमट लिंबू पाणी किंवा जिरे पाणी. 1 उकडलेले अंडे आणि 5 भिजवलेले बदाम (प्रथिने आणि हेल्दी फॅटसाठी)

Photo Credit; instagram

नाश्ता (सकाळी 9 ते 10 वाजता) ओट्स चीला किंवा व्हेजिटेबल उपमा. हे फायबर रीच असून याच्या सेवनाने पोट भरल्यासारखे वाटते. ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी (ऊर्जा वाढवण्यासाठी)

Photo Credit; instagram

मिड-मॉर्निंग नाश्ता (12 वाजता) 1 फळ (सफरचंद किंवा पेरू, ज्यामध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर असते.) मूठभर मखाना (कमी कॅलरीचा नाश्ता).

Photo Credit; instagram

दुपारचे जेवण (दुपारी 2 ते 3) 1 कप क्विनोआ किंवा ब्राउन राइस, प्रथिनांसाठी ग्रिल्ड पनीर/चिकन किंवा डाळ, भरपूर सॅलड (काकडी, गाजर, टोमॅटो).

Photo Credit; instagram

संध्याकाळचा नाश्ता (संध्याकाळी 5 वाजता) प्रोटीन शेक, भाजलेले हरभरे किंवा अंकुरलेले धान्य आणि हर्बल चहा

Photo Credit; instagram

रात्रीचे जेवण (सायंकाळी 7 ते 8) रोस्टेड भाज्या किंवा सूपसोबत ग्रील्ड फिश/पनीर. रात्री कार्बोहायड्रेट घेऊ नका किंवा खूप कमी कार्बोहायड्रेट घ्या.

Photo Credit; instagram

याशिवाय ती साखर आणि जंक फूड खात नव्हती. हे कठीण आहे पण गेम चेंजर असल्याचं तिने सांगितलं.

पुढील वेब स्टोरी

20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय

इथे क्लिक करा