Photo Credit; instagram

बाईईई...हा काय प्रकार! जिमला न जाता चक्क 30 किलो वजन केलं कमी, कसं ते बघाच

Photo Credit; instagram

अनेकांना वजन कमी करणं खूप अवघड वाटतं. त्यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी तासन् तास जिममध्ये जाऊन वर्कआउट करावा लागतो.

Photo Credit; instagram

मात्र, एका महिलेने जिमला न जाता फक्त पायी चालून आणि रनिंग करुन तिचं वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

एबरडीन, यूनायटेड किंगडममध्ये राहणाऱ्या एका गृहिणीने होम एक्सरसाइझ करून आणि वॉक तसेच रनिंगने आपलं 30 किलो वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

या महिलेचं नाव ज्योती थोर्वे असून ती 33 वर्षांची आहे आणि तिला एक 6 वर्षांचा मुलगा आहे. पूर्वी तिचं वजन 90 किलो असल्याचं तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

वजन कमी केल्यानंतर तिचं वजन आता जवळपास 60 किलो इतकं झालं आहे. तिच्या लठ्ठपणामुळे तिचे नातेवाईक सुद्धा तिला खूप टोमणे मारायचे.

Photo Credit; instagram

2021 पासून तिने आपल्या आहाराकडे लक्ष देण्याचं ठरवलं आणि हळूहळू तिचं वजन कमी होत गेलं. 7 ते 8 महिन्यांमध्ये तिने 30 किलो वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि आले मिसळून एक ग्लास गरम पाणी पिणे हा तिच्या दिनचर्येतील भाग होता. याशिवाय, ती दिवसातून 3 वेळा जेवण करायची. म्हणजेच नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण.

Photo Credit; instagram

तिन्ही वेळच्या जेवणातील कॅलरीज मिळून ती सुमारे 1700 कॅलरीज घ्यायची. ती नाश्त्यात बदाम आणि काजूसह प्रोटीन शेक घ्यायची.

Photo Credit; instagram

दुपारच्या जेवणात ती 2 चपात्या किंवा 1 बाजरीची भाकरी, 2 कप डाळ किंवा 1 कप भाज्या, कोशिंबीर आणि 1 ग्लास ताक असायची. रात्रीच्या जेवणात ती सॅलड + सोया चाप किंवा सॅलेडसोबत प्रोटीन शेक घ्यायची.

Photo Credit; instagram

याशिवाय, ती आठवड्यातून एक चीट डे ठेवायची आणि त्या दिवशी ती तिच्या आवडीचे प्रत्येक पदार्थ मनापासून खात असायची.

Photo Credit; instagram

वर्कआउट म्हणून ती बाहेर वॉकसाठी आणि रनिंगसाठी जायची. बऱ्याचदा ती घरी ट्रेडमिलवर धावायची.

पुढील वेब स्टोरी

Dream 11 विजेत्याला रोहित शर्माकडून सर्वात महागडी कार गिफ्ट; म्हणाला, कोणाला ठेवलं कॅप्टन?

इथे क्लिक करा