Photo Credit; canva

श्रावण जवळ येतोय, Non veg ऐवजी Veg भाज्यांमधून मिळवा प्रोटीन

Photo Credit; canva

प्रोटीन म्हणजेच प्रथिने आपल्या आपल्या शरीरातील आवश्यक पोषक तत्त्वांपैकी एक आहे. यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती, स्नायूंचा विकास आणि शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत होते.

Photo Credit; canva

अनेकांच्या मते केवळ अंडी, मांस किंवा डाळींमधून प्रोटीन मिळवता येतं. मात्र, याव्यतिरिक्त काही भाज्या प्रोटीनचं उत्तम स्त्रोत आहेत.

Photo Credit; canva

जर तुम्ही शाकाहारी असाल आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्रस्त असाल तर काही भाज्या तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. प्रोटीन वाढीसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर ठरतात?

Photo Credit; canva

हिरवे वाटाणे चविष्ट असण्यासोबत प्रोटीनचं चांगलं स्त्रोत असल्याचं मानल जातं. 100 ग्रॅम वाटाण्यांमध्ये जवळपास 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन असतं. यातील घटक त्वचेसाठी आणि पचनासाठी सुद्धा मदतशीर असतात.

Photo Credit; canva

ब्रोकलीमध्ये प्रोटीनसोबत बरेच अँटीऑक्सीडेंट्स आढळतात. 100 ग्रॅम ब्रोकलीमध्ये 3 ते 4 ग्रॅम प्रोटीन असतं. हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन K चं सुद्धा उत्तम स्त्रोत असल्याचं मानलं जातं.

Photo Credit; canva

पालक लोहाचं मुख्य स्त्रोत मानलं जातं. मात्र, हे प्रोटीनसाठी सुद्धा चांगला पर्याय ठरतो. 100 ग्रॅम पालकमध्ये सुमारे 2.9 ग्रॅम प्रोटीन आढळतं. याव्यतिरिक्त त्वचा आणि डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले पोषक तत्त्व यात असतात.

Photo Credit; canva

भेंडीसुद्धा प्रोटीनचं चांगलं स्त्रोत आहे. 100 ग्रॅम भेंडीमध्ये 2 ते 3 ग्रॅम प्रोटीन असून यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. याव्यतिरिक्त, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यासाठी भेंडी फायदेशीर असते.

पुढील वेब स्टोरी

'या' 3 गोष्टींपासून दूरच राहा, नाहीतर मृत्यू..., चाणक्य निती काय सांगते?

इथे क्लिक करा