Photo Credit; instagram

आहारात 'या' 6 पदार्थांचा समावेश... झटपट होईल वजन कमी

Photo Credit; instagram

आजकाल, लठ्ठपणाच्या समस्येमुळे अनेकजण त्रासलेले असल्याचं पाहायला मिळतं. लठ्ठपणा बऱ्याच आजारांना देखील आमंत्रण देतं. वजन वाढल्यानंतर ते कमी करणं खूपच अवघड होऊन बसतं.

Photo Credit; instagram

मात्र, योग्य आहार आणि नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला अगदी पटकन वजन कमी करायचं असेल तर व्यायामासोबत आहारात 'या' पदार्थांचा समावेश फायदेशीर ठरेल.

Photo Credit; instagram

पालेभाज्यांमध्ये बरीच पोषक तत्त्वं आढळतात आणि यांच्या सेवनाने बऱ्याच प्रमाणात वजन कमी केले जाऊ शकते. यामुळे अधिक काळ भरलेलं वाटतं आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरीमध्ये अगदी कमी प्रमाणात कॅलरीज आढळतात. तसेच, यामध्ये भरपूर अँटी-ऑक्सीडेंट्स आणि फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यात मदत होते.

Photo Credit; instagram

आहारात बीन्स आणि डाळींचा समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

ग्रीन टी मध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स आणि मेटाबॉलिजम वाढीसाठी कारणीभूत असलेले घटक आढळतात. याच्या सेवनाने फॅट बर्न होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

क्विनोआ, ब्राउन राइस आणि ओट्स सारखे पदार्थ पोट अधिक काळ भरलेलं ठेवण्यास मदत करतात. यामुळे वजन राहण्यास देखील मदत होते. वजन कमी करण्यासाठी अशा पदार्थांचं सेवन उत्तम पर्याय ठरतात.

Photo Credit; instagram

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स आढळतात. नाश्त्यामध्ये यांचं सेवन केल्याने शरीरात दिवसभर एनर्जी राहते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

पुढील वेब स्टोरी

सकाळी रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, विषय होईल गंभीर...

इथे क्लिक करा