सध्या, बॅली फॅट कमी करणं खूपच अवघड काम असल्याचं मानलं जातं. बॅली फॅट म्हणजेच सुटलेल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात.
Photo Credit; canva
बरेच उपाय आणि प्रयत्न करुन सुद्धा वजन कमी करण्यासाठी हवा तसा परिणाम पाहायला मिळत नाही. आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या साहाय्याने पोटाची चरबी झटपट कमी होईल.
Photo Credit; canva
2022 च्या एका रिपोर्टनुसार, बॅली फॅट कमी करण्यासाठी आहारात स्पाइसी म्हणजेच तिखट पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरेल. अशा पदार्थांमध्ये कॅप्साइसिन आढळतं, जे फॅट बर्न करण्यास मदतशीर ठरतं.
Photo Credit; canva
तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी आहारात प्रोबायोटिक रिच फूड्सचा समावेश करणं गरजेचं आहे. यांचं सेवन केल्याने पोटातील गुड बॅक्टेरिया वाढतात आणि वजन कमी होण्यास उपयुक्त ठरते.
Photo Credit; canva
सोल्युबल फायबर असलेल्या पदार्थांचा जसे की ओट्स, आळशीच्या बिया आणि डाळींचा आहारात समावेश करा. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि बॅली फॅट कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; canva
एका स्टडीनुसार, भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यानं सूज कमी होते आणि बॅली फॅटसुद्धा कमी होण्यास मदत मिळते.
Photo Credit; canva
पालेभाज्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते आणि मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वं आढळतात. अशा भाज्यांचं सेवन बॅली फॅट कमी होण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतं.
Photo Credit; canva
दररोज व्यायाम, डान्स किंवा वॉक केल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. 2013 च्या एका रिपोर्टनुसार, जे लोक आठवड्यात 200 मिनिटांहून अधिक काळ व्यायाम करतात, त्यांचं वजन बऱ्याच प्रमाणात कमी होतं.
Photo Credit; canva
मद्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. मद्याचं सेवन केल्यानं शरीरात फॅट ब्रेकडाउनची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे कमी प्रमाणात याचं सेवन करा.